Bus stealing jewelry: बस प्रवासात दागिन्यांची चोरी सतत वाढत आहे. मागील 15 दिवसात चोरट्यांनी साडेतीन लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत, अशा घटना वारंवार घडत आहेत.
15 दिवसाच्या आत साडेतीन लाखाचे दागिने लांबवले
आखाडा बाळापूर (Bus stealing jewelry) : बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दागदागिन्यावर चोरट्यांचा डोळा असुन पंधरा दिवसाच्या आत दोन घटनात साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबविले आहे. यापूर्वी दोन तिन घटना अशाच घडलेल्या आहे.
25 एप्रिल रोजी दूपारी साडेतीन ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान आखाडा बाळापूर शिक्षक कॉलनीत राहत असलेल्या गणेश रामभाऊ शिंदे हे अकोला ते नांदेड बसमधून मालेगाव येथून आखाडा बाळापूर येथे येण्यासाठी बसले असता अज्ञात इसमाने बसमध्ये ठेवलेल्या बैगमधील 2लाख 80 हजार कीमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. 12 दिवसापूर्वी कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील शारदा विठ्ठल माखणे या 13 एप्रिल रोजी वारंगाफाटा बसस्थानक येथून वारंगाफाटा ते उमरखेड एसटी बसने जात असताना बसला गर्दी जास्त असल्याने जवळील बैग एका अज्ञात व्यक्तीजवळ दिली. (Bus stealing jewelry) बसमध्ये सिटवर ठेवण्यासाठी दिली व बसमध्ये सिटवर बसल्यावर बैग बघितले असता बैगमधील मणीमंगळसुत्र 7ग्रम 35 हजार रुपयांचे व कानातील दोन झुंबर 7 ग्रम 35 हजार किमतीचे असा 70हजार रुपयांचे सोन्याचे दागिने सदर अज्ञात चोरट्यांने लंपास केले होते.
यापूर्वी 12 नोव्हेंबर रोजी बउर येथील वयोवृद्ध महिला शकुंतला जयवंतराव माहुरे या आखाडा बाळापूर ते बउर दरम्यान प्रवास करत असताना 56 हजार कीमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. आशा प्रवास दरम्यान दागिने लंपास घटना वारंवार घडत आहेत.