Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

शिवसेना उबाठा बैठक

पक्ष विस्तारासाठी झोकून देऊन काम करा: प्रा. खेडेकर

Shiv Sena (UBT) Meeting: गद्दार सोडून गेलेतरी पक्ष संघटना आहे तिथेच जबाबदारीने आणि निष्ठेने काम करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळे पक्षाची पाळंमुळं आज जनमानसांमध्ये खोलवर रुजल


पक्ष विस्तारासाठी झोकून देऊन काम करा प्रा खेडेकर

Shiv Sena (UBT) Meeting |


शिवसेना उबाठाच्या बैठकीत विविध विषयांवर पदाधिकाऱ्यांची मंथन बैठक

बुलढाणा (Shiv Sena (UBT) Meeting) : गद्दार सोडून गेलेतरी पक्ष संघटना आहे तिथेच जबाबदारीने आणि निष्ठेने काम करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळे पक्षाची पाळंमुळं आज जनमानसांमध्ये खोलवर रुजलेली आहेत. उद्धव ठाकरेंचे हात मजबूत करण्यासाठी पक्ष विस्ताराच्या अनुषंगाने झोकून देऊन कामाला लागा, असे आवाहन जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी केले. 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची (Shiv Sena (UBT) Meeting) बुलढाणा जिल्हा पदाधिकारी बैठक रविवार १२ जुलै रोजी बुलढाणा रेसिडेन्सी येथे पार पडली. बैठकीला आ. सिद्धार्थ खरात, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत व गजानन वाघ, राज्यप्रवक्ता जयश्रीताई शेळके, सहसंपर्कप्रमुख डी. एस. लहाने, दत्ताभाऊ पाटील, वसंतराव भोजने, जिल्हा संघटक सुमित सरदार, युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे, शुभम पाटील, मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे, वसंतराव झाल्टे, गजानन धांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

बैठकीत पक्ष विस्तार, आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तयारी तसेच निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेत पक्षाच्या बूथ लेव्हल एजंट (BLA) यांनी सक्रिय सहभाग घेण्याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी सांगितले की, पक्षाच्या पातळीवर  महाराष्ट्रात BLA नियुक्तीमध्ये बुलढाणा जिल्ह्याचे काम आघाडीवर आहे. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. संघटनात्मक कामासाठी देखील  सर्वांनी एकत्रित पुढाकार घेऊन काम करावे, असे आवाहन केले.

आ. सिद्धार्थ खरात म्हणाले की, शिवसेना पक्षाचा आमदार म्हणून जनतेने दाखविलेला विश्वास आपण पावसाळी अधिवेशनात सार्थकी लावला. जनहिताच्या विविध विषयांवर शासनाला धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडणे हेच माझे कर्तव्य आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना विचार आणि निष्ठेच्या पायावर केली आहे. मूठभर लोक पक्ष सोडून गेल्याने शिवसेना संपणार नाही.

निष्ठावंतांमुळे संघटना बांधणीला जोर- बुधवत

भाजपाने राम मंदिर देणगीमध्ये केलेल्या कथित घोटाळ्याविरोधात संपूर्ण महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढा उभारण्याची गरज आहे. तसेच आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आतापासून कामाला लागावे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा. यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण , रुग्णांना फळ वाटप व अन्य उपक्रम राबवावेत. पक्ष वाढीसाठी  केवळ सोशल मीडियावर सक्रिय राहून उपयोग नाही; प्रत्यक्ष जनसंपर्क वाढविणे अधिक महत्त्वाचे आहे, असे यावेळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत म्हणाले.पक्षाला सोडून गेलेले आमदार-खासदार म्हणजे शिवसेना नव्हे. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या विचारांचे आणि बाळकडूचे बळ आजही शिवसैनिकांमध्ये आहे. मातोश्री निष्ठेमुळे आणि  त्याच बळावर शिवसेनेचा झंझवात पुढे जात आहे, असेही ते म्हणाले

संघर्षाला शस्त्र बनवण्याची हीच खरी वेळ- जयश्रीताई 

पक्षातील आमदार-खासदार पक्ष सोडून गेले असलेतरी आजही सामान्य शिवसैनिक पक्षासोबत ठामपणे उभा आहे. जवळचा माणूस सोडून गेल्याचे दुःख निश्चित आहे; मात्र आता त्याच दुःखाला संघर्षाचे शस्त्र बनविण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत सेनापती युद्धभूमीवर लढत आहे, तोपर्यंत सैन्याचा पराभव होणे अशक्य आहे.  जोपर्यंत निष्ठावान शिवसैनिक पक्षासोबत आहेत, तोपर्यंत शिवसेना कोणीही संपवू शकत नाही. सत्ता कायम बदलत असते. आपलीही वेळ निश्चित येईल, यात कोणतीही शंका नाही.. असे यावेळी जयश्रीताई शेळके  म्हणाल्या.

प्रारंभी प्रा. सिद्धेश्वर आंधळे यांनी प्रबोधनातून विचार मंथन घडवून आणले. यावेळी गजानन वाघ, दत्ता पाटील, डी. एस. लहाने यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख आणि अंगीकृत संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.