Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

शिवसेना गजानन धांडे

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या बुलढाणा जिल्हा समन्वयकपदी गजानन धांडे

ShivSena Gajanan Dhande: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या बुलढाणा जिल्हा पदाधिकारी बैठकीत गजानन धांडे यांची जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली.


शिवसेना उबाठा पक्षाच्या बुलढाणा जिल्हा समन्वयकपदी गजानन धांडे

ShivSena Gajanan Dhande |

 

बुलढाणा (ShivSena Gajanan Dhande) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या बुलढाणा जिल्हा पदाधिकारी बैठकीत गजानन धांडे यांची जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली. पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची बुलढाणा जिल्हा पदाधिकारी बैठक रविवारी दि. १२ जुलै रोजी बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी येथे पार पडली. बैठकीला जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, आ. सिद्धार्थ खरात, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत व गजानन वाघ, राज्यप्रवक्ता जयश्रीताई शेळके, सहसंपर्कप्रमुख डी. एस. लहाने, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील व वसंतराव भोजने, जिल्हा संघटक सुमित सरदार, युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे, शुभम पाटील, मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे,  वसंतराव झाल्टे, यांच्यासह सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहर प्रमुख व अंतर्गत संघटनांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

नियुक्तीची घोषणा होताच उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात गजानन धांडे (ShivSena Gajanan Dhande) यांचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना शुभेच्छा देत पक्ष विस्तार, संघटन बळकटी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने समन्वयाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याचा विश्वास व्यक्त केला. नवनियुक्त जिल्हा समन्वयक गजानन धांडे (ShivSena Gajanan Dhande) यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत जिल्हाभरात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि प्रत्येक शिवसैनिकाला सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related to this topic: