Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

महसूल ऑफिस CCTV

महसूल गेटवरील CCTV ला बेशरमाचा हार घालून निषेध

Revenue Office CCTV: बुलढाण्यातील महसूल गेटवर बसविलेल्या CCTV कॅमेऱ्याला बेशरमाचा हारा घालून युवापक्षीने धोरणातील दुरुपयोगाची आरोप पटाकले. केंद्रीय अधिकाऱ्यांवर अवैध वाळू वाहतुकी


महसूल गेटवरील cctv ला बेशरमाचा हार घालून निषेध

Revenue Office CCTV |

 

अवैध वाळू वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

चिखली (Revenue Office CCTV) : मंडपगाव ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) येथील महसूल गेटवर शासनाने बसविलेल्या CCTV कॅमेऱ्याला युवासेना जिल्हाध्यक्ष संतोष भुतेकर व सचिनभाई कदम यांनी गुरुवारी बेशरमाच्या पानाफुलांचा हार घालून निषेध व्यक्त केला. महसूल गेटखालून सुरू असलेल्या कथित अवैध वाळू वाहतुकीकडे संबंधित विभागांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

भुतेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलने व तक्रारींमुळे काही काळ अवैध रेती वाहतूक बंद झाली होती. मात्र, सध्या पुन्हा रात्रीसह दिवसा देखील मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. (Revenue Office CCTV) शासनाने सार्वजनिक निधीतून बसविलेल्या CCTV यंत्रणेतून वाहनांची माहिती व व्हिडिओ पुरावे उपलब्ध होऊ शकतात, तरीही महसूल, पोलीस व खनिकर्म विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच, खडकपूर्णा प्रकल्प परिसरात अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटी बिनधास्तपणे कार्यरत असल्याने प्रकल्पाच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जर CCTV फुटेजमध्ये अवैध वाळू वाहतूक स्पष्टपणे दिसत असेल आणि तरीही संबंधित अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता व गौण खनिज नियमांनुसार कारवाई होत नसेल, तर हे कर्तव्यातील कसूर व कायद्याच्या अंमलबजावणीतील गंभीर अपयश असल्याचे भुतेकर यांनी सांगितले.

याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून CCTV फुटेज (Revenue Office CCTV) जप्त करावे, संबंधित कालावधीतील सर्व फुटेजची तपासणी करावी तसेच अवैध वाळू तस्करांसह निष्काळजी अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा महसूल गेट व CCTV यंत्रणा या केवळ दिखाऊ उपाययोजना असल्याचा संदेश जनतेत जात असल्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी अनेक दिवसांपासून त्या परिसरात कार्यरत असलेल्या संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या भूमिकेची चौकशी करून त्यांच्यावरही कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

Related to this topic: