Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

बोरी धरणे आंदोलन

बोरीत पुरुषांचे मुंडन आंदोलन तर महिलांचा मशाल मोर्चा

Bori Dharne Protest: बोरीचे अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी धरणे आंदोलनाला बसलेल्या तरुण, पुरुषांनी मुंडन आंदोलन तर महिलांनी मशाल मोर्चा काढून पाठिंबा दिला


बोरीत पुरुषांचे मुंडन आंदोलन तर महिलांचा मशाल मोर्चा

Bori Dharne Protest |

 

अप्पर तहसील कार्यालयाची मागणी; दोघांची प्रकृती खालावली

बोरी (Bori Dharne Protest) : येथे अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी धरणे आंदोलनाला बसलेल्या तरुण, पुरुषांनी मुंडन आंदोलन तर महिलांनी मशाल मोर्चा काढून पाठिंबा दिला. दरम्यान या आंदोलनास बसलेल्या दोन तरुणांची प्रकृती खालावल्याचे निदर्शनास आले. 

बोरी येथे मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय लवकरात लवकर कार्यान्वित करावे, या (Bori Dharne Protest) मागणीसाठी आंदोलन सुरू असून गुरुवार १८  जून रोजी पुरुषांनी मुंडण आंदोलन केले.या आंदोलनात २८ ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला. येथील राष्ट्रमाता जिजाऊ चौकात १४ जूनपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलन ठिकाणी सामूहिक मुंडण आंदोलन करण्यात आले. यावेळी मुंडण करून ग्रामस्थांनी घोषणा दिल्या. या धरणे आंदोलनात सहा युवक आमरण उपोषणाला बसले आहेत. तसेच धरणे आंदोलनाला दिवसभर परिसरातील नागरिकांनी भेटी दिल्या. मुंडण केलेल्या २८ लोकांचे केस बॉक्समध्ये पॅक करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पार्सलमार्फत निषेधार्थ पाठविण्यात येणार आहेत.

मुंडण करून जिजाऊ चौक ते बस थांबा या मार्गावर रॅली काढून शासनाचा निषेध करण्यात आला.  सदर  मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या युवकांना पाठिंबा म्हणून महिलांनी देखील शनिवार २० जून रोजी मशाल मोर्चा काढला. या मोर्चात महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा जिजाऊ चौक, बसथांबा, माळी गल्ली, राम मंदिर, आंबेडकर चौक, कौसडी फाटा मार्गे आंदोलनस्थळी दाखल झाला. (Bori Dharne Protest) तरुणांच्या बेमुदत धरणे आंदोलनाला गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने प्रत्यक्ष भेटी देऊन पाठिंबा देत आहेत. दरम्यान या आंदोलनात सहभागी असलेल्या दोन जणांची प्रकृती खालावल्याचे निदर्शनास आले आहे.