Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ

शाळकरी मुलींचे ब्लॅकमेलिंग प्रकरण उघड; तिघांना अटक, ४० पीडितांचा संशय

मूल शहरात शाळकरी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करणाऱ्या धक्कादायक रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.


शाळकरी मुलींचे ब्लॅकमेलिंग प्रकरण उघड तिघांना अटक ४० पीडितांचा संशय

Blackmail Racket |

चंद्रपूर (Blackmail Racket) : मूल शहरात शाळकरी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करणाऱ्या धक्कादायक रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, पीडित मुलींची संख्या मोठी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शाळकरी मुलींना प्रेमाचे आमिष दाखवत जाळ्यात ओढत होते. त्यानंतर चंद्रपूर मार्गावरील एका हॉटेलमध्ये नेऊन त्यांचे अश्लील चित्रीकरण करण्यात येत होते. हे व्हिडिओ ‘स्नॅपचॅट’सारख्या सोशल मीडियावर शेअर करून मुलींना बदनामीची भीती दाखवत पैशांची उकळपट्टी केली जात होती.

या प्रकरणाचा उलगडा तेव्हा झाला, जेव्हा आरोपींनी एका पीडित मुलीच्या वडिलांनाच अश्लील व्हिडिओ पाठवून पैशांची मागणी केली. संबंधित पालकांनी धैर्य दाखवत तात्काळ मूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुप्त तपास करून या टोळीचा पर्दाफाश केला.

या घटनेत एका मुलीने भीतीपोटी घरातील दागिने व रोख रक्कम आरोपींना दिल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी सांगितले की, सध्या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, ४० मुलींच्या व्हिडिओबाबत सखोल तपास सुरू आहे.

या प्रकरणात आरोपींवर POCSO कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार सुरू होता, ते प्रशासनाने सील केले आहे. दरम्यान, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत तपास CID कडे सोपवण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

सध्या या प्रकरणाचा पुढील तपास अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू असून, आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related to this topic: