Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > पुणे

पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना; बिश्नोई गँगशी संबंधित दोघांकडून फर्निचर मॉलवर गोळीबार

पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.


पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना बिश्नोई गँगशी संबंधित दोघांकडून फर्निचर मॉलवर गोळीबार

Bishnoi Gang |

पुणे (Bishnoi Gang) : पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित दोन शूटरांनी एका फर्निचर मॉलवर तब्बल ६ गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत त्यांनी दोन पिस्तुलांचा वापर केल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही शूटर दुचाकीवरून आले आणि त्यांनी मॉलवर सलग ५ ते ६ राउंड फायरिंग केली. हा हल्ला शुभम लोणकर याच्या सूचनेवरून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

गोळीबारानंतर फेसबुक पोस्टद्वारे कबुली
घटनेनंतर लोणकरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर पोस्ट करत हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे वृत्त आहे. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही शूटर मॉलवर सतत गोळीबार करताना स्पष्टपणे दिसत आहेत.

या हल्ल्यात ‘AJ Furniture Mall’चे मोठे नुकसान झाले असून बाहेरील काचांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा मॉल अशोक नैन यांचा असल्याचे समोर आले आहे.

मालकाला धमकी
फेसबुक पोस्टमध्ये नैन यांना थेट धमकी देण्यात आली असून, त्यांच्यावर एमडी ड्रग्स तस्करीत सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुढची गोळी थेट त्यांच्या डोक्यावर झाडली जाईल, अशी धमकीही देण्यात आली आहे.

पोलीस तपास सुरू
घटनेनंतर स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे. बिश्नोई गँगशी संबंधित या प्रकरणात विशेष पथके तयार करण्यात आली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रकरण गांभीर्याने तपासले जात असून सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे.

Related to this topic: