Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

महाराजस्व अभियान

भांडेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पहिला टप्पा संपन्न

Maharajswa Abhiyan: हिंगोली जिल्ह्यातील भांडेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा पहिला टप्पा संपन्न झाला.


भांडेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पहिला टप्पा संपन्न

Maharajswa Abhiyan |

हिंगोली (Maharajswa Abhiyan) : शासनाच्या आदेशान्वये मौजे भांडेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणे, डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे, भांडेगाव गावाचा गावठाण क्षेत्राचा नकाशा तयार करून भुमिअभिलेख कार्यालयाने तालुक्यात सर्व प्रथम सनदा वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.  

तालुक्यातील भांडेगाव येथे महसुल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान (Maharajswa Abhiyan) राबविण्यात आले. या अभियानास उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, नायब तहसीलदार अनिता वडवळकर, अध्यक्ष नरेंद्र इंगळे, मंडळ अधिकारी शिल्पा चाटसे, भांडेगावचे पोलिस पाटील ज्ञानेश्‍वर जाधव, खांबाळा पोलिस पाटील सुरेश पुरी, वैद्यकीय अधिकारी डॉ.गट्टु, जि.प.मुख्याध्यापक वानखेडे, माजी जि.प.सदस्य माधव कोरडे, भुमि अभिलेख उप अधिक्षक प्रमोद माळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या (Maharajswa Abhiyan) अभियानांतर्गत ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी अभियाना राबविण्यात आले. तसेच सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणे, महाराष्ट्र जमिन महसूल संहितेच्या नवीन तरतुदींची जनजागृती करणे/ प्रभावी अंमलबजावणी करणे, डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे, नागरिकांना  द्वारा सेवा पुरविणे, व जिवंत ७/१२ मोहिमेंतर्गत वारसा नोंदी घेणे, आदी उपक्रम राबविण्यात आले.

या (Maharajswa Abhiyan) शिबिरास ग्राम महसुल अधिकारी अनिल काळे, तलाठी विनोद ठाकरे, दिनकर धरणे, ग्रा.म.अ.वैभव सोसे, श्रीमती कुलकर्णी, वाठोरे, नारायण जगताप, उषाबाई नायक, संतोष जगताप, भगवान खिल्लारे, नामदेव जगताप, राजु जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पशुवैद्यकीय दवाखाना, भूमी अभिलेख कार्यालय, कृषी कार्यालय, ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी, सेतू केंद्र, पुरवठा विभाग रेशन दुकानदार, संजय गांधी लाभार्थी, मंडळाचे सरपंच व नागरिक आदी सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त भांडेगाव मंडळातील पोलिस पाटील यांचा महसुल विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Related to this topic: