World Environment Day: भाजपा युवा मोर्चा ने 'एक पेड माँ के नाम' अभियानात भाग घेतला. शिवाजीनगरमध्ये नाना-नानी पार्क येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राबविला.
नांदेड (World Environment Day) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने शहरात पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'एक पेड माँ के नाम' या देशव्यापी अभियानांतर्गत शिवाजीनगर परिसरातील प्रसिद्ध नाना-नानी पार्क येथे वृक्षारोपण करण्यात आले. या (World Environment Day) उपक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चाचे महानगर अध्यक्ष शशिकांत पाटील क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
६ मे रोजी झालेल्या या कार्यक्रमादरम्यान नाना-नानी पार्कच्या परिसरात विविध प्रकारच्या सावली देणाऱ्या आणि पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी बोलताना महानगर अध्यक्ष शशिकांत क्षीरसागर यांनी वाढत्या तापमानावर आणि पर्यावरणाच्या ढासळत्या संतुलनावर चिंता व्यक्त केली. "केवळ वृक्षारोपण करून न थांबता, लावलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन करण्याची जबाबदारीही आपण घेतली पाहिजे," असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना व नागरिकांना केले.
या (World Environment Day) वृक्षारोपण मोहिमेला भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला. 'एक पेड माँ के नाम' या संकल्पनेला दाद देत प्रत्येकाने पर्यावरणाचा समतोल राखण्याची शपथ घेतली.या प्रसंगी भाजपा सरचिटणीस विजय येवणकर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष शशिकांत क्षीरसागर,करण चव्हाण, प्रियेश ठाकूर,शिवा लोट,बालाजी बोकारे, सचिन नरंगले, किरण पारडे, शुभम खोडके यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.