Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

बासंबा जोरदार पाऊस

मानवी साखळी द्वारे बासंबा ग्रामस्थांनी ओलांडला ओढा

Basamba Heavy rain: बासंबा  ते पिंपरखेड रस्त्यावर असलेल्या ओढ्यावर पुल उभारण्यात आला नसल्याने या भागात झालेल्या पावसामुळे ओढ्याला पुर आला होता  गावकऱ्यांसह शेतकऱ्यांना मानवी साखळी करून ओढा ओलांडला


मानवी साखळी द्वारे बासंबा ग्रामस्थांनी ओलांडला ओढा

Basamba Heavy rain |

बासंबा परिसरात जोरदार पाऊस 

बासंबा (Basamba Heavy rain) : हिंगोली तालुक्यातील  बासंबा परिसरात २४ जुन बुधवार रोजी जोरदार पाऊस झाला या पावसामुळे बासंबा  ते पिंपरखेड रस्त्यावर असलेल्या ओढ्यावर पुल उभारण्यात आला नसल्याने या भागात झालेल्या पावसामुळे ओढ्याला पुर आला होता  गावकऱ्यांसह शेतकऱ्यांना मानवी साखळी करून ओढा ओलांडला.

बासंबा परिसरात बुधवारी जोरदार पाऊस झाला पावसाने ओढे नाले तुडुंब भरले यावर्षी जवळपास जून महिन्यात पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला होता  पावसामुळे ओढ नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक शेतकरी वर्गांनी लावलेल्या हळदी सुद्धा पाण्याअभावी वाळून गेल्या तर कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात हळदीचे पीक जमिनीत सडून गेले यावर्षी दुष्काळ आहे या चिंतेत शेतकरी असताना बासंबा व परिसरात  झालेल्या  पावसाने ओढे नाले तुडुंब भरले असून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागणार असल्याने शेतकऱ्यातून या पावसामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

बासंबा ते पिंपरखेड हा पूर्वीपासूनच दोन्ही गावाला जोडणारा मुख्य रस्ता असून या ओढ्यावर पुल नसल्याने पावसाळ्यात ओढ्यातून ते जा करावी लागते  ओढ्यावर पूल उभारण्याची मागणी करून सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. याचा फटका गावकऱ्यांना बसत आहे. बुधवारी गावकऱ्यांनी मानवी साखळी तयार करून ही नदी ओलांडली आहे