Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

बालयोगी गोपाल महाराज

प्रभू श्रीराम हाच जीवनाचा आराम: बालयोगी गोपाल महाराज

Balayogi Gopal Maharaj: बालयोगी गोपाल महाराज यांनी रामनवमी निमित्त भारतीय संस्कृतीचे आदर्श म्हणून प्रभू श्रीरामचंद्राच्या जीवनाचे महत्व सांगितले.


प्रभू श्रीराम हाच जीवनाचा आराम बालयोगी गोपाल महाराज 

Balayogi Gopal Maharaj |

मानोरा (Balayogi Gopal Maharaj) : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र हे भारतीय संस्कृतीचे आदर्श आहेत, संसारातील तापाने पोळलेल्या जीवाला खऱ्या अर्थाने प्रभू श्री रामचंद्राचे आदर्शवत चरित्र निश्चित प्रेरणादायी आहे. आपल्या जीवनामध्ये मंगल प्राप्त करून घ्यायचे असेल तर प्रभू श्रीरामचंद्राचे संपूर्ण जीवन चरित्र आचरण करण्याची गरज आहे. अर्थात राम हाच जीवनाचा आराम आहे. असे प्रतिपादन श्रीक्षेत्र आसोला खुर्द येथे परमहंस श्री सोमनाथ महाराज यांच्या समाधीस्थळी सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथेत ह भ प श्री बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर (Balayogi Gopal Maharaj) यांनी २६ मार्च रोजी रामनवमी दिनी केले. 

याप्रसंगी श्रीमद् भागवत कथेत श्री राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पुढे भागवताचार्य बालयोगी गोपाल महाराज महाराज म्हणाले की, प्रभू श्रीरामचंद्राचे चरित्र श्रवण करताना नित्य नवा पर्व अनुभव येत असतो. आदर्श पुत्र प्रभू श्रीराम, आदर्श पती प्रभू श्रीराम, आदर्श राजा प्रभू श्रीराम, आदर्श योद्धा प्रभू श्रीराम, भारतीय संस्कृतीचा आदर्शही प्रभू श्रीरामचंद्र हे सूत्र कधीही विसरता येणार नाही. धावपळीच्या या जीवनामध्ये प्रत्येक मानव मात्रा करिता यशस्वी जीवनाची आचारसंहिता म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र होय. 

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र  यांची चरित्र जीवनात आनंद करणारे आहे. तरुणांनी श्रीमद् भागवत कथेमधून श्रीनारायण भगवान श्रीकृष्ण आणि राम कथेतून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम चंद्राच्या गुणांचे बोध घ्यावा, असे (Balayogi Gopal Maharaj) महाराजांनी श्रीमद् भागवत कथा श्रवण करणाऱ्या हजारो भाविकांना उद्देशून सांगितले.

Related to this topic: