Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

Baliraja Shet Pandan Rasta

विधानसभा क्षेत्राच्या सह अध्यक्षपदी गणेश जाधव यांची निवड

मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ता योजनेच्या कारंजा-मानोरा विधानसभा क्षेत्राच्या सह अध्यक्षपदी पोहरादेवी भाजपा मंडळाचे तालुका अध्यक्ष गणेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


विधानसभा क्षेत्राच्या सह अध्यक्षपदी गणेश जाधव यांची निवड

Baliraja Shet Pandan Rasta, |

मानोरा : मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ता योजनेच्या कारंजा-मानोरा विधानसभा क्षेत्राच्या सह अध्यक्षपदी पोहरादेवी भाजपा मंडळाचे तालुका अध्यक्ष गणेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच आमदार सईताई डहाके यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत नवनियुक्त सह अध्यक्ष गणेश जाधव यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

महायुती सरकारने शेतकऱ्यांना शेतापर्यंत बारमाही रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ता योजना सुरू केली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीस गती देण्याच्या उद्देशाने विविध स्तरांवर नियुक्त्या करण्यात येत असून, त्याच अनुषंगाने गणेश जाधव यांच्यावर सह अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

तालुक्यात शेत पांदण रस्त्यांचे जाळे मजबूत झाल्यास शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहतूक अधिक सुलभ होणार असून, कृषी कामांना गती मिळण्यासह ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही नवी चालना मिळणार आहे. या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी भाजपा पोहरादेवी मंडळाचे अध्यक्ष गणेश जाधव यांची निवड झाल्याबद्दल आमदार सईताई डहाके व आमदार बाबूसिंग महाराज राठोड यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला.

शासनाने सोपविलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून कृषी क्षेत्रातील कामांना गती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे कार्य करत राहणार असल्याचा विश्वास नवनियुक्त सह अध्यक्ष गणेश जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी गोलू डहाके, भाजपा प्रदेश सह संयोजक भक्तराज महाराज, मानोरा तालुका सरचिटणीस राजू देशमुख, प्रवीण धोटे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉ. अरविंद यावलकर, वैद्यकीय असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश लोथे, सामील राठोड यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: