Breaking News
  • शिवसेना नेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे 5 जूनला नंदुरबार दौऱ्यावर
  • 'एक पेड बाप के नाम' गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्री पंकजा मुंडे यांचा मोठा संकल्प
  • दिल्लीत हॉटेलमध्ये भीषण आग, आतापर्यंत 21 जणांचा होरपळून मृत्यू
  • भिंत अंगावर कोसळून वृध्द दाम्पत्याचा मृत्यू, पंढरपुरातील धक्कादायक घटना
  • भोंदू अशोक खरातचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे
  • नीट पेपर लीक प्रकरण; 20 दिवसापासून सीबीआयचे पथक लातूरमध्ये तळ ठोकून
  • परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी
  • शेखर गोरेंची नाराजी रास्त; पक्ष योग्य संधी देईल - जयकुमार गोरे
  • 40 वर्षापासून सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यांवर पोलिसांनी का कारवाई केली नाही - अण्णा बनसोडे

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

औंढा नागनाथ बस अपघात

हिवरा पाटी जवळ बसच्या धडकेत एक जण गंभीर जखमी

Aundha Nagnath Bus Accident: औंढा नागनाथ ते हिंगोली मार्गावर औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा पाटी जवळ मंगळवार, दिनांक २ जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास बसच्या धडकेत एक जण गंभीर जखमी


हिवरा पाटी जवळ बसच्या धडकेत एक जण गंभीर जखमी 

Aundha Nagnath Bus Accident |

हिंगोली (Aundha Nagnath Bus Accident) : औंढा नागनाथ ते हिंगोली मार्गावर औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा पाटी जवळ मंगळवार, दिनांक २ जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास बसच्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अकोला ते परभणी जाणारी बस क्रमांक एमएच ४९ बीझेड ९३७५ ने पायी जात असलेल्या भाऊराव गणेशराव मुखमहाले, वय ४० वर्षे, रा. मेथा ता. औंढा नागनाथ यांना जोरदार धडक दिली. या अपघातात भाऊराव मुखमहाले गंभीर जखमी झाले आहेत. 

अपघाताची माहिती मिळताच औंढा नागनाथ (Aundha Nagnath Bus Accident) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, पोलीस उपनिरीक्षक अमोल इंगोले, जमादार रविकांत हरकळ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमीला उपचारासाठी हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जखमीला नांदेड येथे हलवण्यात आले आहे.

अपघातग्रस्त बस पोलिसांनी ताब्यात घेऊन औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या आवारात लावली आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.