Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

CATC कॅम्प विजय

शंकरनगर येथील CATC कॅम्पमध्ये सरजूदेवी भिकुलाल भारूका आर्य कन्या विद्यालयाच्या कॅडेट्सची चमकदार कामगिरी

CATC Camp Victory: CATC कॅम्प समारोपात कॅडेट्सने पहिले स्थान पटकावले, रौप्य/कांस्य पदके मिळवली. सर्वोच्च पुरस्कार 'बेस्ट कॅडेट' तन्वी सरकटे हिला.


शंकरनगर येथील catc कॅम्पमध्ये सरजूदेवी भिकुलाल भारूका आर्य कन्या विद्यालयाच्या कॅडेट्सची चमकदार कामगिरी

CATC Camp Victory |

 

कर्नल रेड्डी यांच्या हस्ते सन्मान 

हिंगोली (CATC Camp Victory) : नांदेड जिल्ह्यातील शंकरनगर येथे आयोजित CATC कॅम्पचा समारोप कॅम्प कमांडंट कर्नल रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. या कॅम्पमध्ये सरजूदेवी भीकुलाल भारूका आर्य कन्या विद्यालयाच्या कॅडेट्सनी (CATC Camp Victory) विविध स्पर्धांमध्ये फर्स्ट अधिकारी सोनल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली घवघवीत यश संपादन करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.  

पुश-अप्स स्पर्धेत कॅडेट सृष्टी खिल्लारे हिने द्वितीय क्रमांक पटकावत रौप्य पदक मिळवले. सांस्कृतिक कार्यक्रमात कॅडेट अक्षरा गिरी आणि राखी बोराटे यांनी तृतीय क्रमांकासह कांस्य पदक पटकावले, तर संतोषी तापडिया हिने सोलो डान्समध्ये तृतीय क्रमांक मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले.  

क्रीडा क्षेत्रातही विद्यालयाच्या कॅडेट्सनी आपला ठसा उमटवला. कॅडेट आयेशा शेख हिने खो-खो खेळात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक प्राप्त केले. (CATC Camp Victory) कॅम्पमधील सर्वोच्च सन्मान 'बेस्ट कॅडेट' हा पुरस्कार कॅडेट तन्वी सरकटे हिला प्रदान करण्यात आला. कर्नल रेड्डी यांच्या हस्ते तन्वीला सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद आणि पालकांनी सर्व विजेत्या कॅडेट्सचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.