Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

अखिल भारतीय साहित्य परिषद

अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. ज्ञानेश्वर गाडे यांची निवड

All India Literary Council:


अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ ज्ञानेश्वर गाडे यांची निवड

All India Literary Council |

हिंगोली (All India Literary Council) : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत, साहित्य भारतीची नुकतीच हिंगोली जिल्हा कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.त्यात जिल्हाध्यक्षपदी संतसाहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.ज्ञानेश्वर गाडे, संघटन मंत्रीपदी उत्कृष्ट गायक गंगाधर जाधव,कार्याध्यक्षपदी प्रसिद्ध कीर्तनकार शि.भ.प शिवशरण गुरुजी रटकलकर, मंत्रीपदी आदर्शशिक्षक हभप कुंडलिक शिंदे,उपाध्यक्षपदी रामकृष्ण जाधव,कार्यालय प्रमुखपदी बालाजी जगताप, कोषाध्यक्षपदी भागवत जगताप,वाचक प्रतिनिधीपदी डॉ.कीर्ती पाटील/यशवंते, लोकसाहित्य प्रमुखपदी प्रा.शिवाजी वरड,प्रा.डॉ.मारोती कऱ्हाळे,बालसाहित्य प्रमुखपदी प्रा.डॉ.अंजली टापरे,युवा साहित्यप्रमुख पदी डॉ.गजानन पोले,रामेश्वर नेहुल,समाज माध्यम प्रमुखपदी प्रा.छाया गाडे तर महिला साहित्यप्रमुख पदी कवयित्री प्रज्ञा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. 

त्याचबरोबर साहित्य भारतीच्या (All India Literary Council) हिंगोली जिल्हा सल्लागार व सदस्य समितीत प्रा.धाराशिव शिराळे,जनार्दन पाटील सुरजखेडकर,डॉ.संजय नाकाडे,डॉ.प्रकाश अंभोरे, प्रा.मुरलीधर जायभाये,प्रा.राम तोडकर,शि.भ. प.प्रवीण व्यवहारे,पत्रकार शिवाजीराव कऱ्हाळे,श्रीमती अर्चनाताई मेटे, श्रीमती सुवर्णाताई रामपूरकर, अमोल आढळकर,प्रा.रमेश झाडे इत्यादी सदस्य यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.

नूतन जिल्हा  कार्यकारीणीच्या माध्यमातून यापुढे हिंगोली जिल्ह्यात साहित्य चळवळीला नवसंजीवनी मिळेल,नवोदित साहित्यिकांना एक व्यासपीठ उपलब्ध होईल.त्याचबरोबर साहित्य, भाषा, संस्कृती, नीतिमूल्ये,पर्यावरण विचाराचे जतन व संवर्धन करून वाचन संस्कृती अधिक बळकट करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या जिल्हा कार्यकारीणीच्या निवडीबद्दल प्रदेश संघटनमंत्री नितीन केळकर,प्रदेश कार्याध्यक्ष शशिकांत घासकडवी,प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रवींद्र बेंबरे त्याचबरोबर देवगिरी प्रांत अध्यक्ष प्रा. डॉ. सर्जेराव जिगे, कार्याध्यक्ष उमेश काळे, प्रांत महामंत्री युवराज नळे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. राजीव यशवंते आदींनी जिल्हा कार्यकारीणीचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.यानिमित्ताने नूतन जिल्हा कार्यकरीणीचे जिल्हाभर कौतुक केल्या जात आहे.