Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कांडलीफाटा दुचाकी अपघात

कांडलीफाटा शिवारात दुचाकी अपघातात पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

Kandli Phata Bike Accident: खाडा बाळापूर ते वारंगा महामार्गावर कांडली फाटा शिवारात दुचाकी अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मयतावर आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालय


कांडलीफाटा शिवारात दुचाकी अपघातात पतीचा मृत्यू पत्नी गंभीर जखमी

Kandli Phata Bike Accident |

आखाडा बाळापूर (Kandli Phata Bike Accident) : आखाडा बाळापूर ते वारंगा महामार्गावर कांडली फाटा शिवारात दुचाकी अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मयतावर आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात बुधवारी ता. १ जुलै रोजी उत्तरीय तपासणी करणयात आली आहे. तर गंभीर जखमी झालेल्या पत्नीला उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे असं सुत्रांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरी (ता. हदगाव) येथील अर्जुन शेषराव इंगळे हे त्यांच्या पत्नीसह मंगळवारी ता. २९ दुचाकी वाहनावर नांदेड येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी नातेवाईकांची भेट घेऊन रात्रीच्या सुमारास आखाडा बाळापूर मार्गे उमरी गावाकडे निघाले होते. त्यांचे दुचाकी वाहन वारंगा ते आखाडा बाळापूर मार्गावर आले असतांना कांडलीफाटा शिवारात त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दोघेही रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले.

या (Kandli Phata Bike Accident) अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शरद मरे, जमादार गजानन राठोड, प्रशांत शिंदे, राजेश घोंगडे, पिराजी बेले, नामदेव पांढरे, परमेश्‍वर सरकटे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांनी दोघांनाही उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी अर्जून यांची वैद्यकिय तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. या (Kandli Phata Bike Accident) अपघातात गंभीर जखमी झालेल्या अर्जून यांच्या पत्नीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.

दरम्यान, मयत अर्जुन यांच्या मृतदेहावर बुधवारी ता. १ आखाडा बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, सदर अपघात नेमका कसा झाला याची माहिती पोलिसांनाही मिळू शकली नाही. या (Kandli Phata Bike Accident) प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. मयत अर्जुन यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असल्याचे पोलिसांनी संगितले.या घटनेमुळे उमरी गावावर शोककळा पसरली आहे.