आ. संतोष बांगर यांनी घातले बळीराजा साठी साकडे
हिंगोली (Shri Vighnaharta Chintamani Ganpati) : हिंगोली शहरातील अत्यंत श्रद्धास्थान असलेल्या 'नवसाला पावणारा श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती'ची भव्य महाआरती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या प्रसंगी कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी विघ्नहर्त्या गणरायाची आरती करून, "माझ्या बळीराजावर व शेतकरी बांधवांवर आलेले सर्व संकट दूर होऊ दे आणि सर्वांना समृद्धी लाभू दे," असे भावूक साकडे गणरायाच्या चरणी घातले.

या (Shri Vighnaharta Chintamani Ganpati) महाआरतीला राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रमुख मान्यवर व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने शिवसेना गट नेते श्रीराम बांगर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम, रतन बांगर, नगरसेवक खली बांगर, गणेश बांगर, कपिल खंडेलवाल, शासकीय कंत्राटदार मयूर कयाल, संदीप बांगर, सुमित चौधरी, बाळू गव्हाणे, हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अभय पाटील आणि कैलास काबरा आदींची प्रमुख उपस्थिती होती. आरतीनंतर परिसर "गणपती बाप्पा मोरया"च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. सर्व उपस्थितांनी विघ्नहर्त्या चिंतामणीचे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला.