Breaking News
  • मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, संगमनेरमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये 4 गावातील मराठा समाजाचे गावकरी आक्रमक,रास्ता रोको आंदोलन
  • पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
  • आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी
  • मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट, नशिराबादेत चेन्नई सायबर क्राईमची धडक!
  • लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड
  • नंदुरबारमध्ये 93 लाखांचा 186 किलो गांजा जप्त
  • OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत
  • माकडांमुळे शाळा बंद, विद्यार्थी व शिक्षक शाळा सोडून पळाले

होम > आणखी > तंत्रज्ञान

Digital Payment

QR कोडने पेमेंट घेणाऱ्या दुकानदारांसाठी मोठी बातमी; १५ सप्टेंबरपर्यंत Re-KYC न केल्यास पेमेंट सुविधा बंद होण्याची शक्यता

डिजिटल पेमेंटचा वापर देशभरात वेगाने वाढत असताना QR कोडद्वारे व्यवहार स्वीकारणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची प्रक्रिया समोर आली आहे.


qr कोडने पेमेंट घेणाऱ्या दुकानदारांसाठी मोठी बातमी १५ सप्टेंबरपर्यंत re-kyc न केल्यास पेमेंट सुविधा बंद होण्याची शक्यता

Digital Payment |

देशातील लाखो छोट्या व्यापाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता; किराणा आणि स्थानिक दुकानदारांसमोर कागदपत्रांच्या पडताळणीचे आव्हान

डिजिटल पेमेंटचा वापर देशभरात वेगाने वाढत असताना QR कोडद्वारे व्यवहार स्वीकारणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची प्रक्रिया समोर आली आहे. पेमेंट कंपन्यांकडून मर्चंट्सची Re-KYC पडताळणी सुरू असून, १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या डिजिटल पेमेंट सुविधेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

या प्रक्रियेमुळे देशभरातील सुमारे १० लाख ऑनलाइन मर्चंट्स प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जवळपास ३० ते ३५ टक्के छोटे व्यापारी निर्धारित मुदतीत Re-KYC पूर्ण करू शकणार नाहीत, असा अंदाज आहे. त्यामुळे छोट्या व्यवसायांसाठी QR कोडवर आधारित पेमेंट स्वीकारण्याची सुविधा कायम ठेवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

छोट्या दुकानदारांसमोर मोठे आव्हान

किराणा दुकाने, छोटे रिटेल व्यवसाय आणि स्थानिक पातळीवरील दुकानदारांना या प्रक्रियेचा विशेष फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषतः QR स्टँडच्या माध्यमातून पेमेंट स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्यांसमोर Re-KYC पूर्ण करताना अडचणी येऊ शकतात.

आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसणे, Re-KYC प्रक्रियेबाबत पुरेशी माहिती नसणे तसेच कागदपत्रांवरील नाव किंवा इतर तपशील ऑनलाइन उपलब्ध डेटाशी जुळत नसणे, यामुळे पडताळणी रखडण्याची शक्यता आहे.

Soundbox वापरणाऱ्या व्यापाऱ्यांची स्थिती तुलनेने चांगली

दुसरीकडे, Soundbox वापरणाऱ्या व्यापाऱ्यांपैकी तब्बल ८५ ते ९० टक्के व्यापारी वेळेत Re-KYC पूर्ण करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पेमेंट कंपन्यांचा या व्यापाऱ्यांशी सातत्याने संपर्क असल्यामुळे त्यांच्यासाठी ही प्रक्रिया तुलनेने सुलभ ठरण्याची शक्यता आहे.

Re-KYC मोहिमेमुळे Paytm, PhonePe आणि Google Pay यांसारख्या डिजिटल पेमेंट कंपन्यांवरील मर्चंट्सची पडताळणी पूर्ण करण्याचा दबावही वाढला आहे.

RBI नियमांमुळे कंपन्यांना प्रत्यक्ष पडताळणी

RBIच्या नियमांनुसार आवश्यक असलेली इन-पर्सन व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्णपणे थर्ड पार्टी एजन्सीकडे सोपवता येत नाही. त्यामुळे पेमेंट कंपन्यांना मर्चंट्सची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी मैदानात उतरावे लागत आहे.

ग्रामीण भाग तसेच छोट्या शहरांमध्ये Re-KYC पूर्ण करण्याचे आव्हान अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे QR कोडच्या माध्यमातून पेमेंट स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपल्या संबंधित पेमेंट कंपनीकडे Re-KYC ची सद्यस्थिती तपासून घ्यावी आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती वेळेत मिळवावी, असे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related to this topic: