Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आणखी > तंत्रज्ञान

Beed Cyber Fraud

शेअर ट्रेडिंगमध्ये बंपर नफ्याचे आमिष; बीडच्या आयटी इंजिनियरला 7.80 लाखांचा सायबर गंडा

शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत गेवराई येथील एका आयटी कंपनीत कार्यरत इंजिनियरची 7 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.


शेअर ट्रेडिंगमध्ये बंपर नफ्याचे आमिष बीडच्या आयटी इंजिनियरला 780 लाखांचा सायबर गंडा

‘सुनील’ आणि ‘विवेक’ नावाने संपर्क साधून जिंकला विश्वास; SEBI नोंदणीचे प्रमाणपत्र निघाले बनावट

बीड : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत गेवराई येथील एका आयटी कंपनीत कार्यरत इंजिनियरची 7 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीलाही सायबर भामट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने जाळ्यात ओढल्याने हा प्रकार चर्चेत आला आहे.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित इंजिनियरने बीड सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून दोन अज्ञात सायबर चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेवराई येथील आयटी इंजिनियर दत्तात्रय सूर्यभान खराद यांच्या मोबाईलवर काही दिवसांपूर्वी एका अनोळखी क्रमांकावरून मेसेज आणि कॉल आला. संपर्क साधणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव ‘सुनील’ असल्याचे सांगितले. आपण ‘ट्रेडिंग ॲडव्हायझरी’ सेवा देत असून शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून कमी कालावधीत मोठा नफा मिळवून देऊ शकतो, असा दावा त्याने केला.

यानंतर सुनीलने दत्तात्रय यांना ‘विवेक’ नावाच्या ब्रोकरच्या माध्यमातून ट्रेडिंग खाते सुरू करण्यास सांगितले. आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दत्तात्रय यांनी आपली ओळखपत्रे पाठवली आणि सुरुवातीला 30 हजार रुपयांची गुंतवणूक केली.

विश्वास बसल्यानंतर आरोपींनी दत्तात्रय यांना ‘मार्केट प्लीज इन्व्हेस्टमेंट लिमिटेड’ आणि ‘भवानी स्टॉक ब्रोकर’ नावाच्या वेगवेगळ्या खात्यांवर ट्रेडिंग करण्यास प्रवृत्त केले. काही दिवसांनी शेअर होल्डिंग आणि झालेल्या नुकसानीची भरपाई करून देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून विविध बँक खात्यांवर 6 लाख 80 हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेण्यात आले. त्यानंतर नफ्यातील हिस्सा देण्याचे कारण सांगत आणखी 40 हजार रुपये घेतले.

आरोपींकडून वारंवार अतिरिक्त पैशांची मागणी होऊ लागल्याने दत्तात्रय यांना संशय आला. त्यांनी संबंधित कंपनीचे अधिकृत SEBI नोंदणी प्रमाणपत्र मागितले. आरोपींनी त्यांना एक प्रमाणपत्र पाठवले; मात्र पडताळणी केल्यानंतर ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

आपली आर्थिक फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर दत्तात्रय यांनी बीड सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी दोन अज्ञात सायबर चोरांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे.

शेअर मार्केट किंवा ट्रेडिंगमधून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवणाऱ्या अनोळखी कॉल आणि मेसेजवर विश्वास ठेवू नये. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित संस्था SEBI नोंदणीकृत आहे की नाही, याची अधिकृत संकेतस्थळावर पडताळणी करावी, असे आवाहन सायबर सेलने केले आहे.

Related to this topic: