Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > विदेश

Nanda Malini

श्रीलंकेच्या संगीतविश्वावर शोककळा; प्रसिद्ध गायिका नंदा मालिनी यांचे ८२व्या वर्षी निधन

​​​​​​​श्रीलंकेच्या संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायिका आणि सामाजिक-राजकीय विषयांवर आपल्या गीतांमधून ठाम भूमिका मांडणाऱ्या नंदा मालिनी यांचे वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाले.


श्रीलंकेच्या संगीतविश्वावर शोककळा प्रसिद्ध गायिका नंदा मालिनी यांचे ८२व्या वर्षी निधन

Nanda Malini |

सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर गीतांतून भाष्य करणाऱ्या नंदा मालिनींची प्रदीर्घ कारकीर्द; ‘Pawana’ अल्बम ठरला विशेष गाजलेला

श्रीलंकेच्या संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायिका आणि सामाजिक-राजकीय विषयांवर आपल्या गीतांमधून ठाम भूमिका मांडणाऱ्या नंदा मालिनी यांचे वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाले. नावलामधील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे श्रीलंकेच्या संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. २३ ऑगस्ट १९४३ रोजी जन्मलेल्या नंदा मालिनी यांचा ८३वा वाढदिवस काही दिवसांवरच आला होता.

कालुतारा येथील एका गावात नऊ भावंडांच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्या आपल्या कुटुंबातील चौथ्या अपत्य होत्या. कोलंबोमध्ये शिक्षण घेत असताना १९५६ मध्ये कविता गायन स्पर्धेत मिळवलेले यश त्यांच्या संगीत प्रवासासाठी महत्त्वाचे ठरले. यानंतर त्यांनी गायन क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.

विशेषतः १९७० आणि १९८०च्या दशकात त्यांच्या सामाजिक आशयाच्या गीतांनी मोठी लोकप्रियता मिळवली. भ्रष्टाचारावर उपरोधिक भाष्य करण्यापासून अन्याय, अत्याचार आणि सामाजिक विषमतेविरोधात आवाज उठवण्यापर्यंत विविध विषय त्यांनी आपल्या गाण्यांमधून मांडले. जातीय आणि धार्मिक भेद विसरून अन्यायाविरोधात एकत्र उभे राहण्याचा संदेशही त्यांच्या गीतांमध्ये सातत्याने दिसून आला.

त्यांच्या कारकिर्दीचा हा काळ श्रीलंकेतील राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेचा होता. बेरोजगारी, विषमता आणि जातीय तणाव वाढत असतानाच १९८३ मध्ये श्रीलंकेत गृहयुद्धाला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर नंदा मालिनी यांच्या काही गीतांच्या प्रसारणावर राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये निर्बंध घालण्यात आले. मात्र, या कारवाईमुळे त्यांच्या लोकप्रियतेत घट झाली नाही.

१९८७ मध्ये प्रसिद्ध झालेला ‘Pawana’ हा अल्बम त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मानवी हक्क आणि सरकारी दडपशाही यांसारख्या संवेदनशील विषयांना गीतांच्या माध्यमातून मांडल्यामुळे या अल्बमला विशेष प्रसिद्धी मिळाली. श्रीलंकेच्या अस्थिर राजकीय-सामाजिक कालखंडाचे संगीताच्या माध्यमातून प्रतिबिंब दाखवणारा दस्तऐवज म्हणून ‘Pawana’कडे आजही पाहिले जाते.

दरम्यान, २०२२ मध्ये श्रीलंकेला आर्थिक संकटाचा मोठा फटका बसल्यानंतर देशभर सरकारविरोधी आंदोलन उभे राहिले. नंदा मालिनी यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता. तसेच त्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलकांसमोर सादरीकरणही केले होते.

आपल्या संगीताच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या नंदा मालिनी यांच्या निधनाने श्रीलंकेच्या सांस्कृतिक विश्वातील एका महत्त्वपूर्ण पर्वाचा अंत झाला आहे.

Related to this topic: