करण कुंद्राच्या आयुष्यातील खास क्षणी अनुषाची एंट्री; नेटकऱ्यांमध्ये रंगली चर्चा

 टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी कारण कुंद्रा आणि तेजस्विनी प्रकाश पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘

करण कुंद्राच्या आयुष्यातील खास क्षणी अनुषाची एंट्री; नेटकऱ्यांमध्ये रंगली चर्चा

Viral Proposal

(Viral Proposal) टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी कारण कुंद्रा आणि तेजस्विनी प्रकाश पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘बिग बॉस १५’पासून सुरू झालेली या दोघांची लव्हस्टोरी आता नव्या टप्प्यावर पोहोचल्याचे दिसत आहे. नुकत्याच एका शोदरम्यान करण कुंद्राने तेजस्वी प्रकाशला अत्यंत रोमँटिक अंदाजात प्रपोज केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

‘देसी ब्लिंग’ या शोमध्ये करणने तेजस्वीसमोर प्रेम व्यक्त करत खास अंदाजात तिला प्रपोज केले. या व्हिडिओनंतर चाहत्यांकडून ‘तेजरान’ जोडीवर कौतुकाचा वर्षाव होत असून, “लग्न कधी?” असा प्रश्नही पुन्हा चर्चेत आला आहे.

मात्र, या आनंदाच्या क्षणातच करण कुंद्राची एक्स-गर्लफ्रेंड  अनुष्का दांडेकर  हिच्या एका क्रिप्टिक पोस्टने सोशल मीडियावर नवा वाद निर्माण केला आहे. करण आणि तेजस्वीच्या प्रपोजलचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच अनुषाने इन्स्टाग्राम स्टोरीवर “I AM THANKING GOD!!! #iykyk” अशी पोस्ट शेअर केली.

अनुषाने पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नसले तरी, ही पोस्ट नेमकी प्रपोजलनंतर आल्यामुळे नेटकऱ्यांनी तिचा संबंध थेट करण-तेजस्वीशी जोडला. काही मिनिटांतच तिच्या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले.

या पोस्टनंतर सोशल मीडियावर दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. काही युझर्सनी ही अनुषाची अप्रत्यक्ष प्रतिक्रिया असल्याचे म्हटले, तर काहींनी तिच्यावर टीका करत “इतकी वर्षे उलटल्यानंतरही ती अजून करणच्या आयुष्याबद्दल प्रतिक्रिया का देते?” असा सवाल उपस्थित केला.

विशेष म्हणजे, करण आणि अनुषा हे २०१५ मध्ये रिलेशनशिपमध्ये होते. त्या काळात टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चित कपल्सपैकी त्यांची गणना केली जायची. मात्र, काही वर्षांनंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर करणच्या आयुष्यात तेजस्वी प्रकाशची एन्ट्री झाली, तर अनुषा देखील आपल्या आयुष्यात पुढे गेली.

आता करण कुंद्राने तेजस्वीला प्रपोज करून त्यांच्या नात्याला अधिकृत स्वरूप दिल्याचे मानले जात असताना, अनुषाच्या ‘थँकिंग गॉड’ पोस्टमुळे सोशल मीडियावर जुन्या नात्यांची पुन्हा चर्चा रंगताना दिसत आहे.

 

संबंधित सामग्री

कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा आई-बाबा होणार; सोशल मीडियावर दिली गुडन्यूज

कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा आई-बाबा होणार; सोशल मीडियावर दिली गुडन्यूज

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा आई-बाबा होणार आहेत. त्यांच्या खास पोस्टनंतर चाहत्यांनी आणि कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

Oct 07, 2026
टेबलवर झुरळ दिसलं अन् जेवणाची इच्छाच गेली; फाईव्ह स्टार हॉटेलच्या Romano रेस्टॉरंटमध्ये टेबलवर झुरळ

टेबलवर झुरळ दिसलं अन् जेवणाची इच्छाच गेली; फाईव्ह स्टार हॉटेलच्या Romano रेस्टॉरंटमध्ये टेबलवर झुरळ

सहारच्या Romano रेस्टॉरंटमध्ये टेबलवर झुरळ आढळल्याचा डॉ. अशोक सेठ यांचा दावा; सोशल मीडिया पोस्टनंतर अन्नसुरक्षा आणि FDAच्या भूमिकेची चर्चा.

Sep 21, 2026
एमी विर्कवर प्राणघातक हल्ला; कॅनडामध्ये गायक-अभिनेत्याच्या गाडीवर झाडल्या 7 गोळ्या

एमी विर्कवर प्राणघातक हल्ला; कॅनडामध्ये गायक-अभिनेत्याच्या गाडीवर झाडल्या 7 गोळ्या

Ammy Virk: पंजाबी गायक आणि अभिनेता एमी विर्कवर कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियामधील ॲबट्सफोर्ड येथे एका कॉन्सर्टनंतर लगेचच प्राणघातक हल्ला झाला.

Sep 09, 2026
जालन्यात बैल वाहतूक करणाऱ्या चालकाला मारहाण; जातीवाचक शिवीगाळ करून तोंडात शेण कोंबल्याचा आरोप

जालन्यात बैल वाहतूक करणाऱ्या चालकाला मारहाण; जातीवाचक शिवीगाळ करून तोंडात शेण कोंबल्याचा आरोप

जालना शहरात बैल घेऊन जाणाऱ्या वाहनचालकाला अडवून मारहाण केल्याचा तसेच जातीवाचक अपशब्द वापरल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

Aug 28, 2026
मुंबई लोकलमध्ये महिलांमध्ये तुफान हाणामारी; ठाणे-बदलापूर लोकलमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई लोकलमध्ये महिलांमध्ये तुफान हाणामारी; ठाणे-बदलापूर लोकलमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबईची लोकल सेवा ही लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार आहे.

Aug 26, 2026