Divorce

आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट; सोशल मीडियावर अधिकृत घोषणा, मुलगी जिजासाठी Co-parenting करणार

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता-निर्माता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर यांनी वैवाहिक आयुष्याबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे.

आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट; सोशल मीडियावर अधिकृत घोषणा, मुलगी जिजासाठी Co-parenting करणार

Divorce

आपसी संमतीने वेगळे होण्याचा निर्णय; प्रायव्हसीचा आदर करण्याचे माध्यमे आणि चाहत्यांना आवाहन

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता-निर्माता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर यांनी वैवाहिक आयुष्याबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्याबाबत विविध चर्चा सुरू असताना, दोघांनीही सोशल मीडियावर अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून आपसी संमतीने आणि सामंजस्याने घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली. त्यांच्या या घोषणेमुळे चाहत्यांसह संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

आदिनाथ आणि ऊर्मिला यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, "खूप विचार केल्यानंतर आम्ही एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे." त्यांनी स्पष्ट केले की, पती-पत्नी म्हणून त्यांचा प्रवास येथे संपत असला तरी, एकमेकांविषयीचा आदर आणि एकत्र घालवलेल्या वर्षांच्या आठवणी कायम राहतील.


दोघांनी त्यांच्या मुलगी जिजा हिचा विशेष उल्लेख करत, आई-वडील म्हणून आपली जबाबदारी पूर्वीप्रमाणेच पार पाडणार असल्याचे सांगितले आहे. "जिजा आमचं सर्वस्व आहे. तिला प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा यासाठी आम्ही पूर्ण जबाबदारीने Co-parenting करत आहोत," असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

याशिवाय, गेल्या अनेक वर्षांत माध्यमे, हितचिंतक आणि चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल दोघांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. आयुष्याच्या नव्या टप्प्यातही सर्वांचे आशीर्वाद कायम राहावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी माध्यमे आणि जनतेला त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करण्याची नम्र विनंती केली आहे. तसेच, या विषयावरील हेच त्यांचे एकमेव अधिकृत वक्तव्य असेल आणि यापुढे कोणतीही प्रतिक्रिया किंवा चर्चा केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, यापूर्वी दोघांनीही त्यावर कोणतेही अधिकृत भाष्य केले नव्हते. अखेर सोशल मीडियावरील संयुक्त निवेदनातून त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.

आदिनाथ कोठारे हे ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचे सुपुत्र आहेत. आदिनाथ आणि ऊर्मिला यांच्यातील मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि 2011 मध्ये दोघांनी विवाह केला. त्यानंतर 2017 मध्ये त्यांच्या घरी मुलगी जिजा हिचा जन्म झाला. जवळपास 15 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर आता या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला असून, मुलगी जिजाच्या संगोपनासाठी मात्र ते एकत्र राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

संबंधित सामग्री

निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी

निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी

नाशिक धर्मांतर प्रकरणातील निदा खानसमोर वैवाहिक संकट. आठ महिन्यांची गर्भवती असताना पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून १६ ऑक्टोबरला कोर्टात हजेरी आहे.

Oct 04, 2026
प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालच्या घरी आनंदाची बातमी; गणेश चतुर्थीला मुलाचा जन्म

प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालच्या घरी आनंदाची बातमी; गणेश चतुर्थीला मुलाचा जन्म

जुबिन नौटियाल बाबा झाला! १४ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी मुलाचा जन्म झाला. आई आणि बाळ सुखरूप असल्याची माहिती जुबिनने दिली.

Sep 29, 2026
महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमवर शोककळा; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन

महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमवर शोककळा; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सृजन टीममधील लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन झाले. सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दुःख व्यक्त केले.

Sep 17, 2026
ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना यांच्यावर सहा तासांची स्पाइन सर्जरी;  रुग्णालयातून शेअर केला हेल्थ अपडेट

ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना यांच्यावर सहा तासांची स्पाइन सर्जरी; रुग्णालयातून शेअर केला हेल्थ अपडेट

ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना यांच्या पाठीच्या कण्यावर सहा तासांची शस्त्रक्रिया झाली. उपचारानंतर त्यांनी रुग्णालयातील आणि घरी परततानाचे फोटो शेअर करत हेल्थ अपडेट दिले.

Sep 12, 2026
डीजे बंदीवर श्रेयस तळपदे स्पष्टच बोलले; ‘सण साजरा करा, पण लोकांना त्रास होता कामा नये’

डीजे बंदीवर श्रेयस तळपदे स्पष्टच बोलले; ‘सण साजरा करा, पण लोकांना त्रास होता कामा नये’

गणेशोत्सवातील डीजेच्या मुद्द्यावर श्रेयस तळपदे यांनी सण साजरे करताना नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. मराठी भाषा आणि ‘हनुमान अंश’वरही त्यांनी भाष्य केले.

Sep 09, 2026