Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > महाराष्ट्र

Viral Audio Clip

नंदुरबार BJP वाद तीव्र; विजय चौधरींविरोधात ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा, व्हायरल ऑडिओ क्लिपवरून कारवाई

माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप असलेल्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे.


नंदुरबार bjp वाद तीव्र विजय चौधरींविरोधात ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा व्हायरल ऑडिओ क्लिपवरून कारवाई

Viral Audio Clip |

डॉ. हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्याचा आरोप; AI द्वारे क्लिपमध्ये छेडछाड झाल्याचा विजय चौधरी यांचा दावा, पक्षातील अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेत

नंदुरबार: भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडकीस आले असून, माजी प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजय चौधरी यांच्याविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात विनयभंग, ॲट्रॉसिटी आणि इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप असलेल्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे.

गेल्या काही दिवसांपासून विजय चौधरी यांच्याशी संबंधित विविध ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या क्लिप्समध्ये अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी तसेच काही मंत्र्यांशी झाल्याचा दावा असलेले संभाषण असल्याने नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, विजय चौधरी आणि संदीप चौधरी यांच्यातील कथित संभाषणाची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर वाद अधिकच वाढला. या क्लिपमध्ये आमदार डॉ. विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्दप्रयोग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी डॉ. हिना गावित यांचे चुलत भाऊ रोहन गावित यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे विजय चौधरी यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यापूर्वीही डॉ. हिना गावित यांच्या भावाने विजय चौधरी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर डॉ. हिना गावित यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नंदुरबार शहर पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालयावर मोर्चा काढून कठोर कारवाईची मागणी केली. तसेच विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणीही भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे.

दुसरीकडे, विजय चौधरी यांनी या सर्व कथित ऑडिओ क्लिप्स कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून छेडछाड (Tamper) केल्याचा दावा केला आहे. या संदर्भात त्यांच्या मुलाने नंदुरबार पोलिसांकडे यापूर्वीच तक्रार दाखल केली असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मंत्री जयकुमार रावल आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतच्या कथित संभाषणाच्या क्लिप्सही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भाजपमधील गटबाजी पुन्हा चर्चेत आली आहे. या क्लिप्सच्या माध्यमातून आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात आल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

Related to this topic: