Dr. Pankaj Bhoyar: विदर्भात 45 ते 47 अंश तापमानामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उष्माघात आणि निर्जलीकरणासाठी शाळा 29 जूनपासून सुरू करण्याची मागणी डॉ. पंकज भोयर यांनी केली.
Dr. Pankaj Bhoyar |
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चिंता; 45 ते 47 अंश तापमान, उष्माघाताचा धोका
वर्धा (Dr. Pankaj Bhoyar) : विदर्भात यंदा उन्हाने अक्षरशः कहर केला असून जून महिन्याच्या सुरुवातीलाही तापमान 45 ते 47 अंश सेल्सिअसच्या आसपास कायम आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या या उष्णतेत शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर (Dr. Pankaj Bhoyar) यांनी विदर्भातील शाळा 15 जूनऐवजी 29 जूनपासून सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.
डॉ. भोयर (Dr. Pankaj Bhoyar) यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चिंता व्यक्त करत उष्माघात, निर्जलीकरण, चक्कर येणे आणि थकवा यांसारख्या समस्यांचा धोका वाढल्याचे निवेदनात नमूद केले आहे. अनेक ग्रामीण भागातील शाळांमध्ये (Vidarbha School) पुरेशा सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निर्जलीकरणाच्या तक्रारी; पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळा (Vidarbha School) सुरू करण्याची तारीख पुढे ढकलावी, अशी मागणी करताना डॉ. भोयर (Dr. Pankaj Bhoyar) यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका मांडली आहे. त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आहे. दरम्यान, पालक व शिक्षक संघटनांकडूनही या निर्णयाचे स्वागत केले जात असून, “आधी मुलांचे आरोग्य महत्त्वाचे” अशी भावना व्यक्त होत आहे.