Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > महाराष्ट्र

शेतकरी कर्जमाफी आंदोलन

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेची निदर्शने!

Farmers Loan Waiver Andolan: शेतकऱ्यांना वि.अट, सर. कट कर्जमाफीची तात्काळ मांग करण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यात निदर्शन केले गेले. शासनाने ३३ हजार कोटी रुपयांचा मदती पॅकेज


शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेची निदर्शने 

Farmers Loan Waiver Andolan |


विनाअट, सरसकट कर्जमाफी द्या; शिवसेना शिष्टमंडळाची मागणी 

लातूर (Farmers Loan Waiver Andolan) : शेतकऱ्यांना विनाअट, सरसकट कर्जमाफी द्यावी या प्रमुख मागणीचा इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्यावतीने लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन देण्यात आले. शेतीमालाला योग्य भाव द्या, बारा तास विद्युत पुरवठा सुरळीत चालू ठेवा, अतिवृष्टी मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष ३३ हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले होते त्याची अंमलबजावणी करा यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांना देण्यात आले.

राज्य सरकारने नुकतीच अनेक अटी व शर्ती घालून कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र सदर अटी शर्तींचा अभ्यास केला असता ही योजना प्रत्यक्षात कर्जमाफी योजना नसून कर्ज वसुली योजना असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. २०२५ मधील अतिवृष्टीनंतर शासनाने ऑक्टोबर २०२५ मध्ये सुमारे ३३ हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा केली होती, मात्र हे पॅकेज आजही कागदावरच असून त्याची प्रत्यक्ष (Farmers Loan Waiver Andolan) अंमलबजावणी झालेली नाही.

या निधीची तात्काळ अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी. विमा कंपन्या केवळ शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असून संपूर्ण लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही त्यानुसार विमा भरपाई मंजूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे विमा कंपनीवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना योग्य भरपाई देण्यात यावी. अशा मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

यांचा आंदोलनात सहभाग...
जिल्हासमन्वक पप्पू भाई कुलकर्णी, महिला जिल्हा संघटिका जयश्रीताई उटगे, उपजिल्हाप्रमुख बी. एन. डोंगरे , उपजिल्हाप्रमुख बजरंग जाधव, खरोसा जिल्हा परिषद सदस्य तानाजी जाधव  तालुकाप्रमुख शंकर रांजणकर, कैलास पाटील, प्रशांत मोरे, अविनाश रेशमे, महानगर प्रमुख विष्णूपंथ साठे, लातूर शहरप्रमुख शिवराज मुळावकर, औसा शहरप्रमुख सुरेशदादा भुरे, उपतालुकाप्रमुख सचिन दत्तू पाटील, महेश फुले, सचिन पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, युवासेना विधानसभाप्रमुख अक्षय चवळे, शिवआरोग्य सेना जिल्हाअध्यक्ष त्र्यंबक स्वामी,फेरीवाला सेना हणमंत पडवळ, विधानसभा समन्वयक सोमनाथ झुंजारे, विधानसभा संघटक विष्णू काबळे, गोविंद बेंबडे, उदगीर तालुका समन्वयक व्यंकट साबणे, शहरसंघटक प्रदीप उपासे, अरुण बिराजदार  उपशहर ऋषिकेश पाटील, रोहित दोपारे, मारुती सूर्यवंशी, करण शिंदे, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख विशाल पवार, पारुडकर, सुमित क्षीरसागर, जीवन जाधव, अनिल यमपाळे, सौरभ पारुडकर, व्यंकट राजेंद्र, देवानंद मुळे इत्यादी शिवसैनिक पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

Related to this topic: