Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > महाराष्ट्र

कफ सिरप खरेदीसाठी आता डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन बंधनकारक; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

सर्दी, खोकला किंवा घशातील त्रास झाल्यानंतर थेट मेडिकल स्टोअरमधून कफ सिरप खरेदी करण्याची सवय असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.


कफ सिरप खरेदीसाठी आता डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन बंधनकारक केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Prescription Mandatory |

OTC विक्रीवर निर्बंध; नियम मोडणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा

(Prescription Mandatory) सर्दी, खोकला किंवा घशातील त्रास झाल्यानंतर थेट मेडिकल स्टोअरमधून कफ सिरप खरेदी करण्याची सवय असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने कफ सिरपसह काही सिरप स्वरूपातील औषधांच्या विक्रीबाबत कठोर नियम लागू केले असून, आता ही औषधे खरेदी करण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक असणार आहे. त्यामुळे स्वमर्जीने औषधे घेण्याच्या पद्धतीवर निर्बंध येणार आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 9 जून रोजी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या निर्णयानुसार, ‘ओव्हर द काउंटर’ (OTC) स्वरूपात म्हणजेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरप आणि तत्सम औषधांची विक्री करता येणार नाही.

या निर्णयामागे काही गंभीर घटना कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे. मध्य प्रदेशात कफ सिरपच्या सेवनानंतर 22 मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्याचप्रमाणे राजस्थानमध्येही खोकल्याचे औषध घेतल्यानंतर काही मुलांचा मृत्यू झाल्याने देशभरात चिंता व्यक्त करण्यात आली होती. या घटनांनंतर औषधांच्या सुरक्षित वापराबाबत प्रश्न उपस्थित झाले आणि सरकारने या विषयावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली.

यापूर्वी डिसेंबर 2024 मध्ये केंद्र सरकारने यासंबंधी अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर आता या निर्णयाची अधिकृत अंमलबजावणी करण्यात आली आहे. भारतातील औषधविषयक नियमांमध्ये 1945 च्या ड्रग्ज नियमांत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, ‘शेड्युल K’ अंतर्गत काही औषधांना मिळणाऱ्या सवलतींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्याअंतर्गत कफ सिरपसारख्या औषधांना मिळणारी सूट रद्द करण्यात आली आहे.

नवीन नियम लागू झाल्यानंतर मेडिकल स्टोअर्सना डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय अशी औषधे विक्री करता येणार नाहीत. त्यामुळे किरकोळ खोकला किंवा सर्दी झाल्यास नागरिकांना प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरणार आहे.

सरकारने स्पष्ट केले आहे की, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या औषध विक्रेत्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. तसेच संबंधित विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाईही करण्यात येऊ शकते. त्यामुळे औषध विक्रेत्यांना नव्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.