Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > महाराष्ट्र

Police Constable

पंढरपुरात आषाढी यात्रेच्या बंदोबस्तादरम्यान एसआरपी जवानाची आत्महत्या; पोलिस दलात खळबळ

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात सुरू असलेल्या बंदोबस्तादरम्यान एका राज्य राखीव पोलिस दल (एसआरपी) जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


पंढरपुरात आषाढी यात्रेच्या बंदोबस्तादरम्यान एसआरपी जवानाची आत्महत्या पोलिस दलात खळबळ

Police Constable |

कासेगाव रोडवरील मुक्कामाच्या ठिकाणी स्वतःवर गोळी झाडली; कामाच्या तणावाचा प्राथमिक अंदाज

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात सुरू असलेल्या बंदोबस्तादरम्यान एका राज्य राखीव पोलिस दल (एसआरपी) जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून, प्राथमिक माहितीनुसार कामाच्या तणावातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर ध्रुपद साबणे हे एसआरपीचे जवान असून ते मूळचे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवासी होते. ते संभाजीनगर येथील एसआरपीमध्ये कार्यरत होते. आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी ते गेल्या तीन ते चार दिवसांपासून पंढरपूरमध्ये तैनात होते.

आज पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या दरम्यान, कासेगाव रोडवरील मुक्कामाच्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात कामाच्या तणावातून ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी अधिकृत कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Related to this topic: