Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > महाराष्ट्र

Pen Ganesh Idol Industry

पेणच्या गणेशमूर्ती उद्योगाला अतिवृष्टीचा मोठा फटका! ४३७ कारखाने बाधित, ५० हजार मूर्तींचे नुकसान

गणेशोत्सवासाठी देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या पेणच्या गणेशमूर्ती उद्योगावर यंदाच्या मुसळधार पावसाने मोठे संकट ओढवले आहे.


पेणच्या गणेशमूर्ती उद्योगाला अतिवृष्टीचा मोठा फटका ४३७ कारखाने बाधित ५० हजार मूर्तींचे नुकसान

Pen Ganesh Idol Industry |

कोट्यवधींची हानी; गणेशोत्सव तोंडावर असताना मूर्तिकारांसमोर ऑर्डर पूर्ण करण्याचे आव्हान, ५ हजारांहून अधिक कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर परिणाम

गणेशोत्सवासाठी देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या पेणच्या गणेशमूर्ती उद्योगावर यंदाच्या मुसळधार पावसाने मोठे संकट ओढवले आहे. अतिवृष्टीमुळे ४३७ गणेशमूर्ती कारखान्यांचे नुकसान झाले असून, सुमारे ५० हजार गणेशमूर्तींना फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मूर्तिकारांसमोर ग्राहकांच्या ऑर्डर वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

पेणमधील गणेशमूर्तींना महाराष्ट्रासह देश-विदेशातून मोठी मागणी असते. त्यामुळे येथील मूर्तिकार वर्षभर मेहनत घेऊन विविध आकार आणि आकर्षक स्वरूपातील गणेशमूर्ती तयार करतात. यंदाही उत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मूर्तींची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, मुसळधार पावसामुळे अनेक कारखान्यांमध्ये पाणी शिरल्याने वर्षभराची मेहनत काही क्षणांत वाया गेली.

पेण शहरासह जोहे, कळवे, शहापूर आणि तांबडशेत परिसरातील गणेश कला केंद्रांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. अनेक तयार मूर्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या, तर काही मूर्तींचे रंग खराब झाले. शाडूच्या मातीपासून बनवलेल्या अनेक मूर्ती पाण्यात भिजून विरघळल्या. याशिवाय रंगकामासाठी लागणारे साहित्य, साचे, शाडूची माती, कच्चा माल आणि विविध उपकरणांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या नुकसानीमुळे केवळ मूर्तिकारांचेच नव्हे, तर या पारंपरिक उद्योगावर अवलंबून असलेल्या ५ हजारांहून अधिक कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम झाला आहे. आधीच कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, वाहतूक खर्च आणि बाजारातील स्पर्धेमुळे उद्योग अडचणीत असताना अतिवृष्टीने परिस्थिती अधिकच गंभीर केली आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, ४३७ कारखानदारांचे नुकसान झाले असून, प्रभावित मूर्तिकारांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून योग्य आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. वेळेत भरपाई मिळाल्यास गणेशमूर्ती उद्योगाला पुन्हा उभारी मिळेल, अशी अपेक्षा कारखानदारांनी व्यक्त केली आहे.

Related to this topic: