Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > महाराष्ट्र

विधान परिषद निवडणूक

परभणी - हिंगोली विधान परिषद निवडणूकीत तिरंगी लढत...!

Legislative Council Elections: परभणी-हिंगोली विधानसभा निवडणूकीत ७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. राष्ट्रवादाचे उमेदवार विजय जामकर आणि संग्राम जामकर यांनी अर्ज मागे घेतला, शेष उमेदवार महायुती,


परभणी - हिंगोली विधान परिषद निवडणूकीत तिरंगी लढत

Legislative Council Elections |

 

उद्योग मंत्री ना. उदय सामंत, ना. मेघनाताई बोर्डीकर यांची शिष्टाई 

विजय जामकर, संग्राम जामकर, विशाल बुधवंत यांचे अर्ज मागे

परभणी (Legislative Council Elections) : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परभणी - हिंगोली विधान परिषद निवडणूक रिंगणात ७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. मात्र गुरुवार ४ जून रोजी राष्ट्रवादीचे मनपा सदस्य विजयसिंह जामकर, जि.प. सदस्य संग्राम जामकर, भाजपचे विशाल बुधवंत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता खरी लढत महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष सुशिल देशमुख यांच्यात होणार असल्याचे दिसून येते. 

परभणी - हिंगोली विधान परिषद निवडणूकीत (Legislative Council Elections) महाविकास आघाडीकडून उबाठाचे डॉ. विवेक नावंदर, महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडून सईद खान, सुशिल देशमुख, विजय जामकर, विश्वजीत बुधवंत, संग्राम जामकर आणि मेहराज खान शेरगुल खान यांनी उमेदवारी दाखल केली होती. गुरुवार ४ जून रोजी कोण कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महायुतीचे उमेदवार सईद खान हे असताना राष्ट्रवादीच्या विजयसिंह जामकर, संग्राम जामकर यांनी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र ना. उदय सामंत हे गुरुवारी परभणीत दाखल झाले. त्यांनी महायुतीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर विजयसिंह जामकर व संग्राम जामकर यांनी अर्ज मागे घेतला. राष्ट्रवादीचे आ. राजेश विटेकर यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला. आता राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी महायुतीचा उमेदवार सईद खान यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दरम्यान या (Legislative Council Elections) निवडणूकीत घोडेबाजार मोठ्या प्रमाणावर होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेनंतर १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडणार असून २१ जून रोजी मतमोजणी केली जाईल.

Related to this topic: