Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > महाराष्ट्र

महात्मा फुले जनआरोग्य योजना

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील ‘कीड’ संपविण्यासाठी आमदार श्वेता महाले यांचा विधानसभेत एल्गार..

Mahatma Phule Jan Arogya Yojana: 'महात्मा फुले जनआरोग्य योजना'ची अंमलबजावणीसाठी लक्खवेध करून जिल्हा समन्वयकांवर आरोपांची नोंद झाली.


महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील ‘कीड’ संपविण्यासाठी आमदार श्वेता महाले यांचा विधानसभेत एल्गार

Mahatma Phule Jan Arogya Yojana |

 

श्वेता महाले यांनी लक्षवेधीद्वारे राज्याचे लक्ष वेधले..

चिखली (Mahatma Phule Jan Arogya Yojana) : राज्यातील गोरगरीब नागरिकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये योजनेच्या अंमलबजावणीत होत असलेल्या गैरव्यवहारांचा मुद्दा चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे जोरदारपणे उपस्थित केला.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत (Mahatma Phule Jan Arogya Yojana) खासगी रुग्णालयांचे अंगीकरण करण्यासाठी मोठ्या आर्थिक व्यवहारांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी, हप्ता न दिल्यास रुग्णालयांना जाणीवपूर्वक त्रास देणे, अंगीकरण रद्द करण्याच्या धमक्या तसेच बोगस रुग्णसंख्या दाखवून शासनाची फसवणूक करण्यास प्रोत्साहन दिले जात असल्याच्या गंभीर आरोपांकडे आमदार श्वेता महाले यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत डेप्युटी सीईओ डॉ. दयानंद जगताप यांना निलंबित करून त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात येणार का?

तसेच अनेक वर्षांपासून एकाच जिल्ह्यात कार्यरत असलेल्या जिल्हा समन्वयकांच्या बदल्या करण्यात येणार का?असे स्पष्ट आणि थेट प्रश्न उपस्थित केले. या लक्षवेधीला उत्तर देताना राज्याचे आरोग्यमंत्री यांनी प्रक्रियेत दोषी आढळणाऱ्या डेप्युटी सीईओसह संबंधित सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या जिल्हा समन्वयकांच्या बदल्याही करण्यात येतील, अशी स्पष्ट ग्वाही सभागृहात दिली.

गोरगरीब रुग्णांच्या हक्काच्या योजनांमध्ये भ्रष्टाचाराला कोणतीही जागा नसावी आणि शासनाच्या प्रत्येक रुपयाचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी भूमिका आमदार श्वेता महाले पाटील यांनी यावेळी ठामपणे मांडली. जनतेचा शासनावरील विश्वास कायम ठेवण्यासाठी आणि आरोग्य योजनांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आपला पाठपुरावा यापुढेही सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.