Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > महाराष्ट्र

Maratha Reservation

29 ऑगस्टला मनोज जरांगे-पाटील यांचे निर्णायक आंदोलन; सरकारला दिला थेट इशारा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत देत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलनाची घोषणा केली आहे.


29 ऑगस्टला मनोज जरांगे-पाटील यांचे निर्णायक आंदोलन सरकारला दिला थेट इशारा

अंतरवाली सराटीत पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; 'या आंदोलनात एकतर मी जाईन, नाहीतर ते जातील' म्हणत सरकारवर जोरदार हल्लाबोल

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत देत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलनाची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत, "या आंदोलनात एकतर मी जाईन, नाहीतर ते जातील," असा स्पष्ट इशारा दिला.

जरांगे-पाटील यांनी सरकारवर मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, मराठा समाजाच्या 58 लाख कुणबी नोंदी उपलब्ध झालेल्या असतानाही पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्रे दिली जात नाहीत. त्यामुळे सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून मराठा समाज सातत्याने आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. मात्र, या कालावधीत सरकारकडून केवळ आश्वासनेच मिळाली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट प्रश्न विचारला. "हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे का दिली जात नाहीत?" असा सवाल करत, उपलब्ध नोंदी असूनही प्रमाणपत्रे नाकारली जात असल्यामुळे समाजात तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

29 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण आंदोलनाला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा दिवस निर्णायक आंदोलनासाठी निवडण्यात आल्याचे जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले. तीन वर्षांच्या संघर्षानंतर आता सरकारकडून होणारी कोणतीही दिशाभूल सहन केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Related to this topic: