Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > महाराष्ट्र

शिक्षक एल्गार

मुंबईच्या आझाद मैदानावर शिक्षकांचा उद्या एल्गार

Teachers Elgar: ऑनलाइन संचमान्यतेच्या सुधारित निकषामुळे राज्यातील शिक्षकांची संख्या आठ ते दहा हजारानी कमी होणार आहे. राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात या प्रश्नाला दिलेले उत्तर दिशाभूल करणारेआहे.


मुंबईच्या आझाद मैदानावर शिक्षकांचा उद्या एल्गार

Teachers Elgar |

 

अन्यायकारक निकषच्या आधारे संचमान्यता

नागपूर (Teachers Elgar) : ऑनलाइन संचमान्यतेच्या सुधारित निकषामुळे राज्यातील शिक्षकांची संख्या आठ ते दहा हजारानी कमी होणार आहे. राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात या प्रश्नाला दिलेले उत्तर दिशाभूल करणारेआहे. नियमबाह्य निकष लादून शिक्षक कमी करण्याचा घाट घातल्या जात असल्याचे विज्युक्टाचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे यांनी म्हटले आहे. प्रचलित निकष डावलून संच मान्यता करणे. हा राज्यातील अनुदानित शिक्षण व्यवस्था संपवण्याचा डाव असल्याचा आरोप महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर यांनी केला आहे.

राज्यातील आठ ते दहा हजार शिक्षकांची पदे कमी होणार

संच मान्यते संदर्भात प्रचलित आधार शासनाला दिले असताना सुद्धा, हेतू पुरस्पर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनापासून सातत्याने ही मागणी महासंघ विज्युक्टा करते आहे व त्यासाठी राज्यभर विविध स्तरावर अनेक आंदोलने सुद्धा घेतल्या गेली, मात्र शासनाला अजूनही जाग येत नाही. त्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. (Teachers Elgar) शासनाच्या या नकारात्मक भूमिकेच्या विरुद्ध सोमवार दिनांक 6 जुलै 2026 ला आझाद मैदान मुंबई येथे प्रचंड धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

आंदोलनाच्या मागण्या: 
1)शासन आदेश असल्याने ग्रामीण आदिवासी भागात 20/30 विद्यार्थ्यांची तुकडी मंजूर करावी. 
2)शा.आ. नुसार 15 मुली ही संख्या तुकडी टिकवण्यासाठी ग्राह्य धरावी. 
3)शिक्षार्थ कपातीची तरतूद कायम ठेवून तुकड्या अनुदानाला पात्र ठेवाव्यात. 
4)शाखा/माध्यम व तुकडीनुसार कार्यभारा ग्राह्य धरावा. 
5) प्रात्यक्षिकची बॅच 20 विद्यार्थी ग्राह्य धरावी 
6)वरिष्ठ महाविद्यालय सलग्न 45 मिनिटाची तासिका कायम ठेवावी 
7)मान्यता विषयाच्या शिक्षकाला त्या विषयाचा कार्यभार देण्यात यावा.
8) पर्यावरण विषयाचे वाटप प्रचलित प्रमाणे व्हावे
9)ऑनलाइन प्रवेशित सर्व विद्यार्थी ग्राह्य धरावे.

याविरुध्द महासंघ व विज्युक्टाचे धरणे आंदोलन

विद्यार्थी संख्येचे निकष बदलून पुढील टप्प्यासाठी शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना अपात्र ठरविण्याचा निर्णय हा ग्रामीण व आदिवासी भागातील कनिष्ठ महाविद्यालये बंद करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल असल्याचा आरोप करत, (Teachers Elgar) शासनाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. अविनाश बोर्डे, विज्युक्टा अध्यक्ष अशोक गव्हाणकर, विज्युक्टा महासचिव डॉ. अभिजीत पोटले, के. का. सहसचिव डॉ. चेतन हिंगणेकर, नागपूर शहर अध्यक्ष डॉ. नितीन देवताळे, नागपूर ग्रामीण अध्यक्ष; प्रा. भाऊ गोरे, महासंघ प्रतिनिधी डॉ. शालिनी तेलरांधे, नागपूर शहर कार्याध्यक्ष डॉ. गजानन धांडे, सचिव प्रा. विवेक देशमुख, सचिव प्रा. परेश देशमुख, सदस्य (नागपूर ग्रामीण) प्रा. विष्णु फुले, अध्यक्ष (काटोल तालुका) प्रा. त्रिभूषण मुंदाने, कोषाध्यक्ष (काटोल तालुका) तसेच प्रा. विशाल टेंभे व प्रा. चंद्रकांत येसनसुरे, सदस्य (काटोल तालुका) नी केले आहे.