Breaking News
  • दिवे घाट येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंग साठी रस्ता बंद
  • महालक्ष्मी एक्सप्रेसच्या डब्याला आग, प्रवाशांमध्ये घबराट
  • विदर्भातील २६ मोठ्या धरणांमध्ये सरासरी ४९.७६ टक्के जलसाठा
  • पुणे शहराच्या निम्म्या भागाचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी बंद
  • अमरावती विमानतळावर 'नाईट लँडिंग' पुन्हा रखडले!
  • नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी MIDC परिसरात कंपनीत आग
  • शहादा शिरपूर रस्त्यावरील पेट्रोल पंपावर दरोडा...
  • साई नगरीत तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात
  • सोलापूर- मुळेगाव गोळीबारातील मुख्य सूत्रधाराला केले जेरबंद

होम > महाराष्ट्र

महाराष्ट्र CET घोटाळा

NEET पेपर लीकनंतर आता महाराष्ट्रात CET घोटाळा?

Maharashtra CET Scam: महाराष्ट्रातील MHT-CET परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल, शिक्षकाच्या व्हिडिओ आणि कथित ऑडिओ क्लिपमुळे परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची


neet पेपर लीकनंतर आता महाराष्ट्रात cet घोटाळा

Maharashtra CET Scam |

 

12वीत 50%, CET मध्ये 90+ पर्सेंटाईलचा दावा

मुंबई (Maharashtra CET Scam) : महाराष्ट्रातील MHT-CET परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका शिक्षकाच्या व्हिडिओ आणि कथित ऑडिओ क्लिपमुळे परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची चर्चा रंगली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

12वीत 50 टक्के, CET मध्ये 90 टक्के

व्हायरल व्हिडिओमध्ये 2022 पासूनच्या काही MHT-CET निकालांबाबत (Maharashtra CET Scam) संशय व्यक्त करण्यात आला आहे. इयत्ता 10वी आणि 12वीमध्ये सुमारे 50 टक्के गुण मिळालेल्या काही विद्यार्थ्यांनी MHT-CET मध्ये 90 पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्यांमुळे परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

99 ते 100 पर्सेंटाईलसाठी ₹12 ते ₹13 लाखांची कथित डील?

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कथित ऑडिओ क्लिपमध्ये इंजिनिअरिंग CET परीक्षेत 99 ते 100 पर्सेंटाईल मिळवून देण्यासाठी ₹12 ते ₹13 लाखांची मागणी केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कथित संभाषणात विशिष्ट परीक्षा केंद्र मिळवून देणे आणि नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा केला जात आहे.

विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम

या कथित व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपनंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर (Maharashtra CET Scam) परीक्षेच्या विश्वासार्हतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, या सर्व आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून संबंधित प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे.