Farmer Loan Waiver List: महाराष्ट्रातील बळीराजाला मोठा दिलासा देणारी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील यांच्या अथक प्रयत्न
उद्या अजितदादांच्या जयंतीनिमित्त शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!
अहमदपूर (Farmer Loan Waiver List) : महाराष्ट्रातील बळीराजाला मोठा दिलासा देणारी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील यांच्या अथक प्रयत्नांची विशेष प्रशंसा करत उद्या स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे.
मागील काही महिन्यांपासून विविध नैसर्गिक संकटं आणि आर्थिक अडचणींशी झुंजणाऱ्या (Farmer Loan Waiver List) बळीराजाला कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील यांनी मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा केला होता आणि तळागाळातील शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत हा विषय अत्यंत ताकदीने धसास लावला होता. सहकार मंत्र्यांची दूरदृष्टी, अतुट प्रयत्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दृढ इच्छाशक्ती यामुळेच राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून या ऐतिहासिक निर्णयानंतर संपूर्ण राज्यासह ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सहकार खात्याची धुरा सांभाळल्यापासून नेहमीच (Farmer Loan Waiver List) शेतकरी हिताच्या निर्णयांना सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या बाबासाहेबजी पाटील यांच्या अभूतपूर्व नेतृत्वाचे सर्वत्र जोरदार कौतुक होत असून शेतकरी वर्गाकडून सहकार मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले जात आहेत; तर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून निघणाऱ्या या पहिल्या यादीमुळे पात्र शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने नवसंजीवनी मिळून आगामी काळात कृषी क्षेत्राला मोठे आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे.