NEET Paper Leak Protest: लातूर येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नीतपत्रांमुळे झालेल्या सतर्कतेसाठी आंदोलन केले. सरकारला लोकशाही मार्गावर प्रतिक्रिया देण्याची मागणी करून आंदोलक
केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी!
लातूर (NEET Paper Leak Protest) : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणादरम्यान प्रशासनाने कथित बळाचा वापर केल्याच्या निषेधार्थ सोमवारी लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात धरणे आंदोलनात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. देशाचे शिक्षण मंत्री राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत सातत्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अशा गंभीर प्रकरणात कोणतीही दिरंगाई न करता पारदर्शक तपास व्हावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. याचबरोबर, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर बळाचा वापर होऊ नये, तसेच नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर राखला जावा, अशीही मागणी आंदोलकांनी केली. देशातील शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, न्याय आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची आवश्यकता उपस्थितांनी अधोरेखित केली.

या (NEET Paper Leak Protest) आंदोलनात तरुणाईचा सहभाग हा लक्षवेधी ठरला लातूर शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दिला या धरणे आंदोलनात जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत सातत्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा गांधी चौकात झालेल्या या आंदोलनादरम्यान परिसर घोषणांनी दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा आणि लोकशाही पद्धतीने मांडल्या जाणाऱ्या मागण्यांची दखल घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
विद्यार्थ्यांसह आंदोलनात मान्यवरांचा सहभाग
या आंदोलनात प्रामुख्याने अँड. उदय गवारे, प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील, मोहसीन खान, रमेश बिरादार, डॉ. बी. आर. पाटील, प्रा. अर्जुन जाधव, प्रा. दत्ता सोमवंशी, माधव बावगे, विश्वंभर भोसले, अँड. संभाजीराव पाटील, संजय मोरे, धर्मराज पाटील, प्राचार्य प्रशांत घार, राजा मणियार, रामकुमार रायवाडीकर, बी. बी. गायकवाड, राजकुमार होळकर, अँड. सुशील सोमवंशी, सोहम कवठेकर, नगरसेवक सचिन गायकवाड, तब्बसुम शेख, अँड प्रवीण पाटील, सुपर्ण जगताप, रंजना हसुरे, रुकसाना मुल्ला, रमेश चिल्ले, अँड. विजय जाधव, अँड. गोविंद शिरसाट, शफी शेख, रामराव गवळी, डी. उमाकांत, उमेश कांबळे, प्रताप भोसले, डॉ. उमाकांत गोदाम, सुभाष जाधव, डॉ. दीपा जगताप, गणेश कांबळे, उत्तरेश्वर बिराजदार, विष्णू सुर्यवंशी, पांडुरंग देडे, अँड. सुनील गायकवाड यांच्यासह अनेक जण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.