IPL 2026: मध्ये डीसीविरुद्ध गुजरातच्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने ५५ धावा करून त्याचे नऊ वर्षांचे दुष्काळ संपवले. गिल आणि बटलरनेही अर्धशतकी खेळी केली.
सुंदर आणि गिलच्या अप्रतिम खेळीमुळे गुजरातचा विजय
नवी दिल्ली (IPL 2026) : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आयपीएल 2026 च्या 14 व्या सामन्यात चौकार आणि षटकारांची उधळण पाहायला मिळाली. गुजरात टायटन्स (GT) चा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar), आयपीएल पदार्पणानंतर जवळपास नऊ वर्षांनी आपल्या कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. सुंदरने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अवघ्या 32 चेंडूंमध्ये 55 धावांची धडाकेबाज खेळी करत गुजरातच्या 210 धावांच्या विशाल धावसंख्येत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
2017 मध्ये पदार्पण केल्यापासून नऊ वर्षांनंतर पहिले अर्धशतक
वॉशिंग्टन सुंदरने 22 एप्रिल 2017 रोजी रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून आपल्या (IPL 2026) आयपीएल प्रवासाला सुरुवात केली. तेव्हापासून त्याने आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबादसारख्या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु अर्धशतकाचा जादुई टप्पा त्याला नेहमीच हुलकावणी देत होता. त्याची यापूर्वीची सर्वोच्च धावसंख्या 49 होती, जी त्याने 2025 मध्ये हैदराबादविरुद्ध केली होती.
कर्णधार गिलसोबत उत्कृष्ट भागीदारी
दिल्लीविरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, त्याने सहा चौकार आणि दोन षटकार मारून धावांचा दुष्काळ संपवला. (Washington Sundar) सुंदरच्या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे कर्णधार (Shubman Gill) शुभमन गिल (70) सोबतचा त्याचा ताळमेळ. या दोघांनी अवघ्या 60 चेंडूंमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. गिलने एक बाजू सांभाळली, तर सुंदरने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत दिल्लीच्या गोलंदाजांवर दबाव टाकला.
बटलर आणि सुंदरचा दुहेरी धमाका
गुजरातच्या डावात केवळ सुंदरच (Washington Sundar) चमकला नाही, तर जोस बटलरनेही इतिहास रचला. बटलरने 27 चेंडूंमध्ये 52 धावा केल्या आणि टी-20 क्रिकेटमधील आपला 600 वा षटकार पूर्ण केला. वेस्ट इंडिजबाहेर हा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला. या (IPL 2026) तीन अर्धशतकांच्या (गिल, सुंदर, बटलर) जोरावर गुजरातने 20 षटकांत 210/4 धावा केल्या.