अभिषेक शर्मा विक्रम

अभिषेक शर्माने रचला भारतीय टी-20 क्रिकेटमध्ये मोठा विक्रम

Abhishek Sharma Record: भारताचा युवा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार फलंदाजी करत भारतीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासात मोठा विक्रम आपल्या नावे केला...

अभिषेक शर्माने रचला भारतीय टी-20 क्रिकेटमध्ये मोठा विक्रम

Abhishek Sharma

 

दिग्गजांना मागे टाकत ठरला सर्वात वेगवान फलंदाज

नवी दिल्ली/ मुंबई (Abhishek Sharma Record) : भारताचा युवा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार फलंदाजी करत भारतीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासात मोठा विक्रम आपल्या नावे केला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अभिषेकने अवघ्या 3420 चेंडूंमध्ये 6000 टी-20 धावा पूर्ण करत भारतीय फलंदाजांमध्ये सर्वात वेगाने हा टप्पा गाठण्याचा मान मिळवला. सामन्यापूर्वी अभिषेकला टी-20 क्रिकेटमध्ये 6000 धावा पूर्ण करण्यासाठी केवळ पाच धावांची गरज होती. अफगाणिस्तानचा गोलंदाज फजलहक फारुकीच्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.

दिग्गजांना टाकले मागे

चेंडूंच्या संख्येनुसार 6000 टी-20 धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आता जगातील आघाडीच्या फलंदाजांमध्ये पोहोचला आहे. या बाबतीत त्याच्यापुढे केवळ न्यूझीलंडचा फिन अ‍ॅलन असून त्याने 3386 चेंडूंमध्ये 6000 धावा पूर्ण केल्या आहेत. वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेलने 3550 चेंडूंमध्ये, तर टिम डेविडने 3681 चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला होता. त्यामुळे अभिषेकने रसेल आणि टिम डेविडसारख्या स्फोटक फलंदाजांनाही मागे टाकले आहे.

विक्रमानंतर आणखी आक्रमक फलंदाजी

6000 धावांचा टप्पा पार केल्यानंतर (Abhishek Sharma) अभिषेकची फलंदाजी आणखी आक्रमक झाली. त्याने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण केला आणि केवळ 22 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. अभिषेकने अखेर 32 चेंडूंमध्ये 82 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या डावात 7 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे भारतासाठी 157 धावांचे लक्ष्य सहजसाध्य ठरले.

ईशान किशनचीही महत्त्वपूर्ण साथ

भारताला सुरुवातीलाच संजू सॅमसनच्या रूपाने धक्का बसला. मात्र त्यानंतर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma आणि ईशान किशन यांनी डाव सावरत धावगतीही कायम ठेवली. ईशान किशनने 33 चेंडूंमध्ये 42 धावा करत अभिषेकला चांगली साथ दिली. या दोघांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे भारताने लक्ष्याचा सहज पाठलाग केला. अखेर भारताने 13.4 षटकांत 157 धावांचे लक्ष्य पूर्ण करत 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. अभिषेक शर्माच्या या विक्रमी कामगिरीमुळे भारतीय टी-20 क्रिकेटला आणखी एक आक्रमक आणि विश्वासार्ह फलंदाज मिळाल्याची चर्चा रंगली आहे.

संबंधित सामग्री

शुभमन गिलचा ऐतिहासिक पराक्रम! पाचव्यांदा आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारावर मोहोर

शुभमन गिलचा ऐतिहासिक पराक्रम! पाचव्यांदा आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारावर मोहोर

Player of the Month Award: भारतीय क्रिकेटसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि महिला संघाची आक्रमक सलामीवीर शेफाली वर्मा

Oct 13, 2026
अभिषेक शर्माचा ऐतिहासिक विक्रम! रोहित-विराटसह सर्वांना टाकले मागे

अभिषेक शर्माचा ऐतिहासिक विक्रम! रोहित-विराटसह सर्वांना टाकले मागे

Abhishek Sharma: भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा याने आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा भारतीय विक्रम प्रस्थापित केला. वेस्ट इंडिजविरुद्ध इंदूर येथे..

Oct 12, 2026
शुभमन गिलचा विक्रमी द्विशतक; वनडेमधील सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग

शुभमन गिलचा विक्रमी द्विशतक; वनडेमधील सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग

Shubman Gill Record: वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने विक्रमी द्विशतक झळकावत इतिहास रचला. गुवाहाटी येथे वेस्ट इंडिजने दिलेल्या 406 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग

Oct 01, 2026
व्ही. व्ही. एस. लक्ष्मण बनणार क्रिकेट डायरेक्टर

व्ही. व्ही. एस. लक्ष्मण बनणार क्रिकेट डायरेक्टर

V. V. S. Laxman: भारतीय क्रिकेट नियामक मंडळात माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सध्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख असलेल्या लक्ष्मण यांचा कार्यकाळ

Aug 14, 2026
रोहित शर्मा यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान; पत्नी रितिका राष्ट्रपती भवनात उपस्थित

रोहित शर्मा यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान; पत्नी रितिका राष्ट्रपती भवनात उपस्थित

Padma Shri Rohit Sharma: रोहित शर्मा ने भारताच्या सर्वात महत्त्वाचा नागरिक सन्मान 'पद्मश्री' हा मिळवला. जगभरच स्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने क्रीडेतील आंतरराष्ट्रीय

Jun 23, 2026