Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > महाराष्ट्र

हिंगोली रघुवीर धर्माधिकारी

हिंगोलीच्या रघुवीर धर्माधिकारी याने सामवेद मूलांत परीक्षेत उत्तम श्रेणी मिळवत वेद परंपरेचा गौरव वाढवला

Hingoli Raghuveer Dharmadhikari: हिंगोलीचे सुपुत्र रघुवीर धर्माधिकारी ने सामवेद मूलांत (राणायनीय शाखेचा पूर्वभाग) परीक्षा उत्तम श्रेणीत उत्तीर्ण करून वेद परंपरा यशस्वीपणे समर्पित केले.


हिंगोलीच्या रघुवीर धर्माधिकारी याने सामवेद मूलांत परीक्षेत उत्तम श्रेणी मिळवत वेद परंपरेचा गौरव वाढवला

Hingoli Raghuveer Dharmadhikari |

हिंगोली (Hingoli Raghuveer Dharmadhikari) : मैसूर येथील अवधूत दत्त पीठम, श्री गणपति सच्चिदानंद आश्रमात नुकत्याच संपन्न झालेल्या द्वादशिका चतुर्वेद परीक्षेत हिंगोलीचे सुपुत्र चि. रघुवीर श्रीपादराव धर्माधिकारी याने सामवेद मूलांत (पूर्वभाग) परीक्षा उत्तम श्रेणीत उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.

SGS VedaNidhi Academy & Masters' Institute तर्फे वैशाख महिन्यात घेण्यात आलेल्या या परीक्षेत रघुवीरने साम वेदाच्या राणायनीय शाखेचा मूलांत विभाग विशेष प्राविण्यासह पूर्ण केला. त्याच्या या यशाबद्दल दि. 16 मे 2026 रोजी मैसूर येथे आयोजित समारंभात वेदमूर्ती सामगंधर्व श्री कृष्णा गुरुजी पळसकर यांच्या हस्ते ‘वेद परीक्षा प्रमाण पत्रम्’ प्रदान करून त्याचा सन्मान करण्यात आला. 

श्री गणपति सच्चिदानंद स्वामीजींच्या दिव्य अनुग्रहाने पार पडलेल्या या परीक्षेत हिंगोलीच्या भूमीपुत्राने मिळवलेल्या यशामुळे जिल्ह्यातील धार्मिक व वैदिक वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. वेदांच्या अध्ययनाकडे नव्या पिढीचा वाढता कल आणि त्यात मिळणारे हे यश वेद परंपरा जपण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. रघुवीरच्या या यशाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related to this topic: