Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > महाराष्ट्र

हिंगोली मुसळधार पाऊस

हिंगोली जिल्ह्यात पावसाने घेतली गती, जुलैत सरासरीपेक्षा 41 टक्क्यांनी अधिक नोंद

Hingoli Heavy Rain: जिल्ह्यात यंदा मान्सूनची वाटचाल संथ राहिली असली तरी जुलै महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. जून महिन्यात हिंगोली जिल्ह्यासाठीचे सरासरी पर्जन्यमान 169.2 मिमी


हिंगोली जिल्ह्यात पावसाने घेतली गती जुलैत सरासरीपेक्षा 41 टक्क्यांनी अधिक नोंद

Hingoli Heavy Rain |

हिंगोली (Hingoli Heavy Rain) : जिल्ह्यात यंदा मान्सूनची वाटचाल संथ राहिली असली तरी जुलै महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. जून महिन्यात हिंगोली जिल्ह्यासाठीचे सरासरी पर्जन्यमान 169.2 मिमी असताना प्रत्यक्षात 120.2 मिमी पाऊस झाला. त्यामुळे जूनचा पाऊस सरासरीच्या 71 टक्के इतका राहिला. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून चित्र बदलले आहे. जुलैसाठीचे सरासरी 37.1 मिमी असताना कालपर्यंत 45.2 मिमी पाऊस पडला होता आणि आज अहवालाच्या दिवशी आणखी 7.4 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे जुलैचे एकूण प्रगतीशील पर्जन्यमान 52.6 मिमी झाले असून ते सरासरीच्या 141.7 टक्के आहे.

जूनपासून आतापर्यंतचा विचार केल्यास (Hingoli Heavy Rain) हिंगोलीसाठीचे सरासरी पर्जन्यमान 206.3 मिमी आहे. त्याच्या तुलनेत 172.8 मिमी पाऊस झाला असून हे प्रमाण सरासरीच्या 83.8 टक्के आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीसाठीचे सरासरी 795.3 मिमी असून आतापर्यंत 21.7 टक्के पाऊस पूर्ण झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 154.2 मिमी पाऊस झाला होता आणि ते प्रमाण सरासरीच्या 74.7 टक्के होते. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत हिंगोली जिल्ह्यात पावसात सुधारणा दिसून येत आहे.

Related to this topic: