Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > महाराष्ट्र

डॉ. विजय दराडे

भारत सरकारच्या 'मेरा युवा भारत' उपक्रमात डॉ. विजय दराडे यांचा विशेष गौरव

Dr. Vijay Darade: हिमाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवरील हांगो गावात 7 दिवस अभ्यास; 14,000 फूट उंचीचा हांगला टॉप सर करून दाखवले धाडस हिंगोली- अहमदपूरचे मूळ रहिवासी


भारत सरकारच्या मेरा युवा भारत उपक्रमात डॉ विजय दराडे यांचा विशेष गौरव  

Dr. Vijay Darade |

 

'विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम'मध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

हिंगोली (Dr. Vijay Darade) : हिमाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवरील हांगो गावात 7 दिवस अभ्यास; 14,000 फूट उंचीचा हांगला टॉप सर करून दाखवले धाडस हिंगोली- अहमदपूरचे मूळ रहिवासी व सध्या हिंगोली येथील डॉ. हेडगेवार दंत महाविद्यालय व रुग्णालयात आंतरवासिता डॉक्टर म्हणून सेवा बजावणारे डॉ. विजय गोपीनाथ दराडे यांना भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'मेरा युवा भारत' उपक्रमांतर्गत 'विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम'मध्ये विशेष कामगिरीबद्दल गौरविण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी देशभरातून केवळ 500 तरुणांची निवड करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्रातील 15 युवकांचा समावेश होता. निवड झालेल्या युवकांना लडाख, जम्मू-काश्मीर व हिमाचल प्रदेश या सीमावर्ती राज्यांतील शेवटच्या टोकावर वसलेल्या गावांमध्ये 7 दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी पाठविण्यात आले होते.

डॉ. विजय दराडे (Dr. Vijay Darade) यांची निवड हिमाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेलगतच्या किन्नौर जिल्ह्यातील हांगो या दुर्गम गावासाठी झाली होती. या दौऱ्यात डॉ. दराडे यांनी गावात मुक्काम करून स्थानिक ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. सीमावर्ती भागातील नागरिकांनी आपली प्राचीन संस्कृती, परंपरा व बोलीभाषा कशी जतन केली आहे, याचा सखोल अभ्यास केला. तसेच त्यांचे दैनंदिन जीवनमान, उपजीविकेची साधने, दळणवळण, आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा आणि सीमेवर राहत असल्याने त्यांना भेडसावणाऱ्या समस्या याबाबत माहिती संकलित करून त्याचा सविस्तर अहवाल भारत सरकारला सादर केला.

या दौऱ्यादरम्यान निवड झालेल्या सर्व युवकांना तीन दिवस भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) दलाच्या कॅम्पमध्ये राहण्याची संधी मिळाली. शून्य अंशाच्या खाली असलेल्या तापमानात, दुर्गम परिस्थितीत देशाच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांचे शौर्य, शिस्त व कर्तव्यनिष्ठा जवळून अनुभवण्याची संधी डॉ. दराडे यांना मिळाली. यावेळी ITBP जवानांनी युवकांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, संरक्षण प्रणाली व सीमेवरील आव्हानात्मक कामगिरीची माहिती दिली.

राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने दौऱ्यादरम्यान विविध सांस्कृतिक व साहसी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांमध्ये डॉ. विजय दराडे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे समुद्रसपाटीपासून सुमारे 14,000 फूट उंचीवर असलेला 'हांगला टॉप' हा दुर्गम पर्वत यशस्वीरित्या सर करून त्यांनी उल्लेखनीय धाडस व जिद्द दाखवली. या सर्वांगीण कामगिरीबद्दल आयोजकांच्या वतीने डॉ. दराडे यांना प्रशस्तीपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.

या यशाबद्दल डॉ. विजय दराडे यांचे वडील गोपीनाथ दराडे, आई जयश्री दराडे, भगिनी श्वेता दहिफळे, मेहुणे गणेश दहिफळे, बंधू डॉ. अजय दराडे यांच्यासह डॉ. हेडगेवार दंत महाविद्यालयाचे अध्यक्ष ललीतराज खुराणा, डॉ. हंसराज खुराणा, अधिष्ठाता डॉ. विवेक चोकसे, डॉ. संगीता पवार, डॉ. श्वेता हब्बू, डॉ. कुणाल देशमुख, डॉ. अंशु शास्त्री, नितीन बेले, विनायक सूर्यपूजारी व सर्व मित्रपरिवाराने अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.