विदर्भ शाळा सुरू

विदर्भातील चिमुकल्यांचा जीव धोक्यात नको; शाळा 29 जूनपासून सुरू कराव्यात : डॉ. पंकज भोयर

Dr. Pankaj Bhoyar: विदर्भात 45 ते 47 अंश तापमानामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उष्माघात आणि निर्जलीकरणासाठी शाळा 29 जूनपासून सुरू करण्याची मागणी डॉ. पंकज भोयर यांनी केली.

विदर्भातील चिमुकल्यांचा जीव धोक्यात नको; शाळा 29 जूनपासून सुरू कराव्यात : डॉ. पंकज भोयर

Dr. Pankaj Bhoyar

 

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चिंता; 45 ते 47 अंश तापमान, उष्माघाताचा धोका

वर्धा (Dr. Pankaj Bhoyar) : विदर्भात यंदा उन्हाने अक्षरशः कहर केला असून जून महिन्याच्या सुरुवातीलाही तापमान 45 ते 47 अंश सेल्सिअसच्या आसपास कायम आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या या उष्णतेत शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर (Dr. Pankaj Bhoyar) यांनी विदर्भातील शाळा 15 जूनऐवजी 29 जूनपासून सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.

डॉ. भोयर (Dr. Pankaj Bhoyar) यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चिंता व्यक्त करत उष्माघात, निर्जलीकरण, चक्कर येणे आणि थकवा यांसारख्या समस्यांचा धोका वाढल्याचे निवेदनात नमूद केले आहे. अनेक ग्रामीण भागातील शाळांमध्ये (Vidarbha School) पुरेशा सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निर्जलीकरणाच्या तक्रारी; पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळा (Vidarbha School) सुरू करण्याची तारीख पुढे ढकलावी, अशी मागणी करताना डॉ. भोयर (Dr. Pankaj Bhoyar) यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका मांडली आहे. त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आहे. दरम्यान, पालक व शिक्षक संघटनांकडूनही या निर्णयाचे स्वागत केले जात असून, “आधी मुलांचे आरोग्य महत्त्वाचे” अशी भावना व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

संच मान्यतेतील त्रुटी दूर करून अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया स्थगित करा

संच मान्यतेतील त्रुटी दूर करून अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया स्थगित करा

Vidarbha Junior College Teachers' Association: सत्र २०२५-२६ च्या संच मान्यतेमध्ये असलेल्या त्रुटी दुरुस्त करून, त्याआधारे सुरू करण्यात आलेली अतिरिक्त शिक्षक समायोजनाची प्रक्रिया तातडीने स्थगित करा...

Oct 01, 2026
घोट येथे स्वतंत्र विदर्भासाठी एल्गार; घोट तालुका निर्मितीची मागणी जोरात..

घोट येथे स्वतंत्र विदर्भासाठी एल्गार; घोट तालुका निर्मितीची मागणी जोरात..

Swatantra Vidarbha Elgar: स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी घोट येथे विदर्भ आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने जोरदार एल्गार पुकारण्यात आला. नागपूर कराराला २८ सप्टेंबर १९५३ रोजी ७३ वर्षे पूर्ण होते..

Sep 28, 2026
महाराष्ट्रात 77 हजार कोटींचे शेती नुकसान? रोहित पवारांचा दावा; हेक्टरी 50 हजारांच्या मदतीची मागणी

महाराष्ट्रात 77 हजार कोटींचे शेती नुकसान? रोहित पवारांचा दावा; हेक्टरी 50 हजारांच्या मदतीची मागणी

रोहित पवारांचा महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शेती नुकसानीवरून सरकारवर निशाणा. 77 हजार कोटींच्या नुकसानीचा दावा करत हेक्टरी 50 हजारांची मदत मागितली.

Sep 28, 2026
उद्या कोरड्या दुष्काळाचा जीआर; शेतकऱ्यांना सरसकट मदत, फडणवीसांची मोठी घोषणा

उद्या कोरड्या दुष्काळाचा जीआर; शेतकऱ्यांना सरसकट मदत, फडणवीसांची मोठी घोषणा

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उद्या कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Sep 24, 2026
विदर्भाला महामार्गांची मोठी भेट; 4 प्रकल्पांना मंजुरी, 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी

विदर्भाला महामार्गांची मोठी भेट; 4 प्रकल्पांना मंजुरी, 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी

पूर्व विदर्भातील 4 महामार्ग प्रकल्पांना मंजुरी; 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरला मोठा फायदा अपेक्षित.

Sep 24, 2026