नागपूर पर्यटन जिल्हा

नागपूरला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा; पर्यटन विकासाला मिळणार नवी दिशा

Nagpur Tourism District: ‘संत्र्यांचे शहर’ म्हणून ओळख असलेल्या नागपूरला राज्य सरकारने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले आहे. पर्यटनाला चालना देण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकास..

नागपूरला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा; पर्यटन विकासाला मिळणार नवी दिशा

Nagpur Tourism District

नागपूर (Nagpur Tourism District) : ‘संत्र्यांचे शहर’ म्हणून ओळख असलेल्या नागपूरला राज्य सरकारने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले आहे. पर्यटनाला चालना देण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला गती देण्याच्या उद्देशाने पर्यटन विभागाने मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

नागपूरला ऐतिहासिक, भौगोलिक, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाची समृद्ध परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या (Nagpur Tourism District) नागपूरचे देशाच्या मध्यवर्ती भागातील स्थानही पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ‘झिरो माईल स्टोन’, गोंड-भोसलेकालीन वास्तू व किल्ले, पेंच राष्ट्रीय उद्यान, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य, रामटेकचे राम मंदिर, जलक्रीडा केंद्र आणि दीक्षाभूमी यांसारखी विविध पर्यटनस्थळे जिल्ह्याचे वैशिष्ट्य ठरली आहेत.

पर्यटन धोरण-२०१६ अंतर्गत नागपूरला यापूर्वी ‘विशेष पर्यटन जिल्हा’ (Nagpur Tourism District) म्हणून घोषित करण्यात आले होते. आता पर्यटन जिल्ह्याचा दर्जा मिळाल्याने जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास, पायाभूत सुविधा आणि पर्यटनविषयक उपक्रमांना अधिक व्यापक चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

व्याघ्र राजधानीची ओळख

पेंच राष्ट्रीय उद्यान, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य आणि परिसरातील व्याघ्रप्रकल्पांमुळे नागपूरच्या पर्यटनवैशिष्ट्यांत वन्यजीव पर्यटनाची भर पडते. समृद्ध वन्यजीवसंपदेच्या पार्श्वभूमीवर नागपूरला ‘भारताची व्याघ्र राजधानी’ अशी ओळख मिळाली आहे. त्यामुळे वन्यजीव पर्यटनाच्या दृष्टीनेही जिल्ह्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

वारशाची समृद्ध परंपरा

गोंड आणि भोसले राजघराण्यांच्या काळातील वास्तू व किल्ले नागपूरच्या (Nagpur Tourism District) ऐतिहासिक वारशाची साक्ष देतात. रामटेकचे पुरातन राम मंदिर, दीक्षाभूमी आणि जलक्रीडा केंद्र यांमुळे धार्मिक, सांस्कृतिक तसेच मनोरंजनात्मक पर्यटनाचे विविध पैलू जिल्ह्यात अनुभवता येतात. पर्यटन जिल्ह्याचा दर्जा मिळाल्याने या वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांच्या विकासाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

नवनीत ग्राम पहाडीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा कटिबद्ध

नवनीत ग्राम पहाडीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा कटिबद्ध

रेगडी, हळदवाही व जिल्हा परिषद क्षेत्रातील नवनीत ग्राम पहाडी येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या नवनीत ग्राम शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रम पार पडला.

Aug 10, 2026
पोहरादेवीतील नंगारा भवन हस्तांतरण रखडले!

पोहरादेवीतील नंगारा भवन हस्तांतरण रखडले!

‘नंगारा भवन व वास्तू संग्रहालय’ अद्यापही हस्तांतरणाच्या प्रतीक्षेत आहे.

Aug 08, 2026
परभणीतील जांभूळ बेटाच्या पर्यटन विकासासाठी केंद्राकडे पाठपुरावा

परभणीतील जांभूळ बेटाच्या पर्यटन विकासासाठी केंद्राकडे पाठपुरावा

Jambhul Bet Tourism Development: विधानसभा मतदार संघाला लाभलेले निसर्गाचे अनमोल वरदान असलेल्या जांभूळ बेट या पर्यटनस्थळाला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख मिळवून देण्यासाठी आ. डॉ.रत्नाकर गुट्टे

Jul 28, 2026
ताडोबातील संस्मरणीय व्याघ्रदर्शनाने ब्रिक्स प्रतिनिधी भारावले

ताडोबातील संस्मरणीय व्याघ्रदर्शनाने ब्रिक्स प्रतिनिधी भारावले

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रोमांचक जंगल सफारी आणि व्याघ्रदर्शनाचा अविस्मरणीय अनुभव घेत ब्रिक्स (BRICS) देशांतील मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ अक्षरशः भारावून गेले.

Jul 13, 2026
स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून नागेश्वर विकास आराखडा तयार करावा - पालकमंत्री नरहरी झिरवाळ

स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून नागेश्वर विकास आराखडा तयार करावा - पालकमंत्री नरहरी झिरवाळ

औंढा नागनाथ मंदिराचा विकास आराखडा स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.

Jun 26, 2026