Tadoba-Andhari Tiger Reserve

ताडोबातील संस्मरणीय व्याघ्रदर्शनाने ब्रिक्स प्रतिनिधी भारावले

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रोमांचक जंगल सफारी आणि व्याघ्रदर्शनाचा अविस्मरणीय अनुभव घेत ब्रिक्स (BRICS) देशांतील मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ अक्षरशः भारावून गेले.

ताडोबातील संस्मरणीय व्याघ्रदर्शनाने ब्रिक्स प्रतिनिधी भारावले

व्याघ्र संवर्धनाच्या कार्याचे कौतुक

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रोमांचक जंगल सफारी आणि व्याघ्रदर्शनाचा अविस्मरणीय अनुभव घेत ब्रिक्स (BRICS) देशांतील मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ अक्षरशः भारावून गेले. सुमारे ७० सदस्यीय उच्चस्तरीय शिष्टमंडळाने शनिवारी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट देत येथील समृद्ध जैवविविधता, व्याघ्र संवर्धन आणि वैज्ञानिक व्यवस्थापनाची प्रत्यक्ष माहिती घेतली.

या दौऱ्यासाठी कोलारा, मदनापूर आणि बेलारा बफर प्रवेशद्वारांवरून २० हून अधिक सफारी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळच्या सफारीदरम्यान रशिया आणि इथिओपियाच्या प्रतिनिधींना प्रसिद्ध T-178 वाघासह T-82 या वाघिणीच्या बछड्याचे दर्शन घडले. तर सायंकाळच्या सफारीत दक्षिण आफ्रिका, इजिप्त आणि इराणच्या प्रतिनिधींना T-178, T-82 चा बछडा आणि TN-9 च्या बछड्याचेही दर्शन झाले. वाघांचे इतक्या जवळून दर्शन झाल्याने प्रतिनिधींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

व्याघ्रदर्शनासोबतच पावसाळ्याच्या सान्निध्यात हिरवाईने नटलेल्या ताडोबाच्या जंगलात चितळ, सांबर, गवा, रानडुक्कर आणि विविध पक्षी प्रजातींचेही दर्शन घडले. वन्यजीवांनी समृद्ध असलेल्या या परिसराचा अनुभव अत्यंत संस्मरणीय असल्याची भावना अनेक प्रतिनिधींनी व्यक्त केली.

प्रतिनिधींनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वैज्ञानिक व्यवस्थापन, अधिवास विकास, शिकारीविरोधी उपाययोजना आणि स्थानिक समुदायांच्या सहभागातून राबविण्यात येणाऱ्या संवर्धन उपक्रमांचे विशेष कौतुक केले. व्याघ्र संवर्धन आणि जबाबदार वन्यजीव पर्यटनाचा उत्कृष्ट नमुना म्हणून ताडोबाची त्यांनी प्रशंसा केली.

या दौऱ्याचे नियोजन आणि समन्वय ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडले. क्षेत्र संचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ला आणि उपसंचालक विशाल माळी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण व्यवस्था करण्यात आली. पर्यटकांच्या सुरक्षिततेसह प्रभावी निसर्ग मार्गदर्शनाची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडण्यात आली.

या भेटीमुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने व्याघ्र संवर्धन आणि वन्यजीव पर्यटन क्षेत्रातील भारताच्या अग्रगण्य स्थळांपैकी एक म्हणून आपली ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा अधोरेखित केली आहे.

 

संबंधित सामग्री

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ११ जणांना १.४४ कोटींचा गंडा

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ११ जणांना १.४४ कोटींचा गंडा

शेअर ट्रेडिंगमध्ये १० ते १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवून चंद्रपुरातील ११ जणांकडून १ कोटी ४४ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप.

Sep 26, 2026
गांधींच्या वर्धा जिल्ह्याला हादरवणारी घटना; तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप

गांधींच्या वर्धा जिल्ह्याला हादरवणारी घटना; तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप

वर्ध्यात 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप; पाच अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल. रेल्वे स्थानकातील CCTV आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू.

Sep 26, 2026
विदर्भाला महामार्गांची मोठी भेट; 4 प्रकल्पांना मंजुरी, 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी

विदर्भाला महामार्गांची मोठी भेट; 4 प्रकल्पांना मंजुरी, 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी

पूर्व विदर्भातील 4 महामार्ग प्रकल्पांना मंजुरी; 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरला मोठा फायदा अपेक्षित.

Sep 24, 2026
भद्रावती शहर हादरले! भर चौकात युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

भद्रावती शहर हादरले! भर चौकात युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

भद्रावतीत भर चौकात ४० वर्षीय उमदेव मेश्राम यांची धारदार शस्त्राने हत्या. अज्ञात आरोपींचा शोध सुरू; पोलिसांकडून तपासाला वेग.

Sep 23, 2026
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; विदर्भात २३ सप्टेंबरपासून पावसाची शक्यता; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; विदर्भात २३ सप्टेंबरपासून पावसाची शक्यता; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे २३ सप्टेंबरपासून विदर्भात पावसाची शक्यता. २४-२५ सप्टेंबरला चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट.

Sep 21, 2026