मुलताई गारपिटी धुमाकूळ

अबब...भर उन्हाळ्यात  बघा मुलताई शहरात बर्फाचे रस्ते

Multai hail and smoke: मुलताई शहरात अचानक गारांचा पाऊस पडल्याने जीवन विस्कळीत झाले. शेतकरी गहू, हरभरा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

अबब...भर उन्हाळ्यात  बघा मुलताई शहरात बर्फाचे रस्ते

Multai hail and smoke

मुलताई शहरात गारांचा रस्ता,शेती व जनजीवनावर मोठा परिणाम

अचानक हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे नुकसान; प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू

मुलताई (Multai hail and smoke) : आज दुपारच्या सुमारास मुलताई शहरातील रस्त्यांवर अक्षरशः  गारांचा पाऊस पडला नागरिकांना चक्क बर्फावरून गाड्या चालवायला लागल्यात. परिसरात अचानक झालेल्या प्रचंड गारपिटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही वेळ सुरू असलेल्या या (Multai hail and smoke) गारपिटीने शेतकऱ्यांचे उभे पिके अक्षरशः जमीनदोस्त केली.

अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जोरदार वाऱ्यासह कोसळलेल्या गारांनी (Multai hail and smoke) रस्त्यांवर पांढऱ्या थराचे दृश्य निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या असून काही भागात वीजपुरवठाही खंडित झाल्याची माहिती आहे.

विशेषतः गहू, हरभरा व भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांनी मोठ्या नुकसानाची भीती व्यक्त केली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू केल्या असून (Multai hail and smoke) नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

संबंधित सामग्री

‘संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतरच मदत’! दुष्काळी मदतीवर बावनकुळेंचं मोठं स्पष्टीकरण

‘संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतरच मदत’! दुष्काळी मदतीवर बावनकुळेंचं मोठं स्पष्टीकरण

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे आणि संपूर्ण अहवालानंतर मदत देण्याची भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली.

Sep 28, 2026
महाराष्ट्रात 77 हजार कोटींचे शेती नुकसान? रोहित पवारांचा दावा; हेक्टरी 50 हजारांच्या मदतीची मागणी

महाराष्ट्रात 77 हजार कोटींचे शेती नुकसान? रोहित पवारांचा दावा; हेक्टरी 50 हजारांच्या मदतीची मागणी

रोहित पवारांचा महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शेती नुकसानीवरून सरकारवर निशाणा. 77 हजार कोटींच्या नुकसानीचा दावा करत हेक्टरी 50 हजारांची मदत मागितली.

Sep 28, 2026
आदित्य ठाकरे कडून मोबाईल टॉर्च च्या उजेडात पीक नुकसानीची पाहणी

आदित्य ठाकरे कडून मोबाईल टॉर्च च्या उजेडात पीक नुकसानीची पाहणी

Aditya Thackeray: वसमत तालुक्यातील माळवटा शिवारात शनिवारी रात्री शिवसेना नेते आदित्य ठाकरे वसमत तालुक्यात आले होते माळवटा शिवारात त्यांनी रात्री आठ साडेआठच्या सुमारास पाहणी केली

Sep 27, 2026
दुष्काळाचा केवळ जीआर, प्रत्यक्ष मदत कधी? सुधाकर देशमुखांचा सरकारवर हल्लाबोल

दुष्काळाचा केवळ जीआर, प्रत्यक्ष मदत कधी? सुधाकर देशमुखांचा सरकारवर हल्लाबोल

२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार? सुधाकर देशमुखांचा सरकारला सवाल.

Sep 27, 2026
घोषणांचा पाऊस नको, अंमलबजावणी कधी? ते सांगा!

घोषणांचा पाऊस नको, अंमलबजावणी कधी? ते सांगा!

औसा तालुक्यातील तावशी (ताड) येथे आदित्य ठाकरेंनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

Sep 27, 2026