वसमत (Aditya Thackeray) : वसमत तालुक्यातील माळवटा शिवारात शनिवारी रात्री शिवसेना नेते आदित्य ठाकरे वसमत तालुक्यात आले होते माळवटा शिवारात त्यांनी रात्री आठ साडेआठच्या सुमारास पाहणी केली. रात्रीच्या अंधारात मोबाईल टॉर्च उजेडात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मराठवाड्यात दुष्काळी पाहणीच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी रात्री त्यांनी तालुक्यातील माळवटा शिवारात पीक नुकसानीची पाहणी केली.
शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी दुष्काळी मदत व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळेल असा सवाल यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी उपस्थित केला शेतकऱ्यांना भेटणं त्यांना धीर देणे गरजेचे असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या समवेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील जिल्हाप्रमुख संदेश देशमुख सुनील काळे, काशिनाथ भोसले,डॉक्टर धोंडीराम पारडीकर नगरसेविका रेणुका पतंगे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माळवटा येथील शेत शिवाराची पाहणी केल्यानंतर आदित्य ठाकरेमार्गस्थ झाले.
रात्रीचा अंधार आणि मोबाईल टॉर्च
दुष्काळी पाहणे करण्यासाठी रात्री उशिरा आदित्य ठाकरे हे माळवटा शिवारातील शेतात उतरणे सर्वत्र अंधार होता अशावेळी मोबाईल टॉर्च उजेडात त्यांनी पिकांची पाहणी केली. रात्रीच्या अंधारात त्यांना काय दिसले हे माहित नाही मात्र मोबाईल टॉर्च च्या उजेडात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून आपली भूमिका मांडली.
आदित्य ठाकरे कडून मोबाईल टॉर्च च्या उजेडात पीक नुकसानीची पाहणी
Aditya Thackeray: वसमत तालुक्यातील माळवटा शिवारात शनिवारी रात्री शिवसेना नेते आदित्य ठाकरे वसमत तालुक्यात आले होते माळवटा शिवारात त्यांनी रात्री आठ साडेआठच्या सुमारास पाहणी केली
Aditya Thackeray
संबंधित सामग्री
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम
पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.
“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे-राऊतांवर पलटवार; पुराव्याशिवाय आरोप होत असल्याचा दावा करत दिशा सालियन प्रकरणावरही सवाल.
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; कायदा-सुव्यवस्थेवर सवाल करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी.
‘संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतरच मदत’! दुष्काळी मदतीवर बावनकुळेंचं मोठं स्पष्टीकरण
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे आणि संपूर्ण अहवालानंतर मदत देण्याची भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली.
महाराष्ट्रात 77 हजार कोटींचे शेती नुकसान? रोहित पवारांचा दावा; हेक्टरी 50 हजारांच्या मदतीची मागणी
रोहित पवारांचा महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शेती नुकसानीवरून सरकारवर निशाणा. 77 हजार कोटींच्या नुकसानीचा दावा करत हेक्टरी 50 हजारांची मदत मागितली.