आ. श्वेता महाले पाटील

शिवरायांच्या रयतेच्या कल्याणाचा विचार घेऊन देवाभाऊंचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी: आ. श्वेता महाले पाटील

MLA Shweta Mahale Patil: “छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा विचार सदैव स्मरणात ठेवूनच देवाभाऊंचे सरकार शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. संकटाच्या काळात जनतेला आधार

शिवरायांच्या रयतेच्या कल्याणाचा विचार घेऊन देवाभाऊंचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी: आ. श्वेता महाले पाटील

MLA Shweta Mahale Patil

चिखली (MLA Shweta Mahale Patil) : “छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा विचार सदैव स्मरणात ठेवूनच देवाभाऊंचे सरकार शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. संकटाच्या काळात जनतेला आधार देणे आणि त्यांच्या अडचणी सोडविणे ही शासनाची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी केले.

चिखली विधानसभा मतदारसंघातील मौजे इसोली येथे गावकऱ्यांच्या पुढाकारातून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व पूजन सोहळा 18 सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडला. आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण व पूजन करण्यात आले. यावेळी शिवप्रेमी, युवक, महिला तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शेतकरी बांधवांशी संवाद साधताना आमदार महाले पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या कल्याणाचा विचार पुढे नेत जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांनी चिंता करू नये, शासन त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ज्या-ज्या ठिकाणी पीक पाहणीची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंचनामे व्यवस्थित आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने होणे आवश्यक असून, शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. सर्व पंचनामे पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकार शेतकऱ्यांना निश्चितपणे न्याय देईल, असेही आमदार महाले पाटील यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाच्या विकासाला विशेष महत्त्व दिले जात असल्याचे नमूद करत त्यांनी शेतीच्या सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याचा उल्लेख केला. सिंचनाच्या माध्यमातून शेतीला स्थैर्य मिळावे आणि शेतकऱ्यांच्या अडचणी कमी व्हाव्यात, यासाठी शासनाच्या विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

इसोली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाचा सोहळा हा केवळ स्मारकाच्या लोकार्पणापुरता मर्यादित न राहता शिवरायांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाज आणि जनतेच्या कल्याणासाठी काम करण्याचा संकल्प अधोरेखित करणारा ठरला. शिवप्रेमी आणि युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष वातावरण निर्माण झाले.

यावेळी संजय गाडेकर, बळीराम काळे, रामेश्वर कोकाटे, विनोद सीताफळे, शिवा भागवत, डॉ. राजेंद्र दिघे, राजू कोकाटे, माणिकराव कोकाटे, डॉ. रईस, राम शेळके, विशाल देशमुख, ज्येष्ठ मंडळीतील किसनमामा कोकाटे, बाळूभाऊ शेळके, रामेश्वर खपके, राजूभाऊ दिघे, सरपंच रईस माणिकराव खरात, लालाजी शेळके, दामू येवले, अनंता शेळके, सुनील शेळके, गोविंद येवले, देवानंद शेळके, महाराज श्याम शेळके, बाळू निकम, आत्माराम घनघाव, गणेश दिघे, प्रकाश लागे, प्रकाश येवले, बद्री येवले, ज्ञानेश्वर सीताफळे, शरद बाठे यांच्यासह शिवप्रेमी, युवक, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टैग्स: MLA Shweta Mahale Patil

संबंधित सामग्री

बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी श्वेता महाले पालकमंत्र्यांसोबत बांधावर

बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी श्वेता महाले पालकमंत्र्यांसोबत बांधावर

MLA Shweta Mahale Patil: शेतकऱ्यांची व्यथा केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्ष शासनापर्यंत पोहोचावी, यासाठी आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत..

Sep 24, 2026
पिकं करपली, शेतकरी हवालदिल; श्वेता महाले पाटील आढावा बैठकीत भावनिक

पिकं करपली, शेतकरी हवालदिल; श्वेता महाले पाटील आढावा बैठकीत भावनिक

MLA Shweta Mahale Patil: शेतकरी वर्षभर कष्ट करून पिकाची काळजी घेतो; मात्र ऐन उत्पादनाच्या काळात पावसाने दगा दिल्याने त्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.पिकं करपली, शेतकरी हवालदिल

Sep 20, 2026
चिखली तालुक्यातील पुनर्वसन प्रश्नांसाठी श्वेता महाले यांचा धडाका; प्रशासनाकडून महत्त्वाचे निर्देश

चिखली तालुक्यातील पुनर्वसन प्रश्नांसाठी श्वेता महाले यांचा धडाका; प्रशासनाकडून महत्त्वाचे निर्देश

MLA Shweta Mahale Patil: विधानसभा मतदारसंघातील पुनर्वसनग्रस्त गावकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळाली आहे. आमदार श्वेता महाले पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची दखल

Sep 10, 2026
चिखलीत महायुतीच्या भव्य दहीहंडीचा थरार; हजारो चिखलीकरांच्या उपस्थितीत उत्साहाला उधाण

चिखलीत महायुतीच्या भव्य दहीहंडीचा थरार; हजारो चिखलीकरांच्या उपस्थितीत उत्साहाला उधाण

Chikhli DahiHandi Festival: श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देणाऱ्या दहीहंडी उत्सवाचा थरार, गोविंदांच्या मानवी मनोऱ्यांची चित्तथरारक उंची, ढोल-ताशांचा कडकडाट, डीजेच्या तालावर हजारो चिखलीकर..

Sep 06, 2026
गणेशोत्सवात गुलालाऐवजी पुष्पवृष्टीचा आदर्श जिल्हाभर राबवा: आ. श्वेता महाले पाटील

गणेशोत्सवात गुलालाऐवजी पुष्पवृष्टीचा आदर्श जिल्हाभर राबवा: आ. श्वेता महाले पाटील

MLA Shweta Mahale Patil: आमदार श्वेता महाले पाटील यांनी जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शांतता, सामाजिक सलोखा आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित..

Sep 04, 2026