आमदार श्वेता महाले पाटील

बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी श्वेता महाले पालकमंत्र्यांसोबत बांधावर

MLA Shweta Mahale Patil: शेतकऱ्यांची व्यथा केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्ष शासनापर्यंत पोहोचावी, यासाठी आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत..

बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी श्वेता महाले पालकमंत्र्यांसोबत बांधावर

MLA Shweta Mahale Patil

 

एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी पालकमंत्र्यांना केली विनंती

चिखली (MLA Shweta Mahale Patil) : पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली असून चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकरी मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची व्यथा केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्ष शासनापर्यंत पोहोचावी, यासाठी आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद जाधव पाटील यांच्या समवेत दुष्काळग्रस्त भागातील शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांची व्यथा जाणून घेतली आणि शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास दिला. त्याच पार्श्वभूमीवर चिखली मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अडचणी शासनाच्या सर्वोच्च स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी आमदार श्वेता महाले पाटील यांनी सातत्याने पालकमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा ठामपणे मांडला. मुख्यमंत्री दौऱ्यानंतर राज्य शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीबाबत निर्णयाची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

मौजे केळवद,सातगाव भुसारी, तसेच मालगणी,बेराळा, वसंतनगर येथील शेताची पाहणी यावेळी करण्यात आली. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत पिकांची सद्यस्थिती, पावसाच्या खंडामुळे झालेली हानी, उत्पादनातील संभाव्य घट आणि त्यांच्या अडचणी आमदार श्वेता महाले पाटील यांनी जाणून घेतल्या. या भावनेतून त्यांनी पालकमंत्र्यांकडे बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्याची मागणी केली.

“चिखली मतदारसंघातील एकही बाधित शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये. पंचनामे आणि नुकसानभरपाईची प्रक्रिया प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती लक्षात घेऊन झाली पाहिजे. बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने संवेदनशीलतेने आणि तत्परतेने निर्णय घ्यावा,” अशी आग्रही भूमिका आमदार श्वेता महाले पाटील यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडली.

यावेळी आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, जिल्हा कृषी अधिकारी संतोष डाबरे, तहसीलदार विजय सवडे, गटविकास अधिकारी समाधान वाघ, तालुका कृषी अधिकारी अशोक सुरडकर यांच्यासह विविध पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

टैग्स: MLA Shweta Mahale Patil

संबंधित सामग्री

पिकं करपली, शेतकरी हवालदिल; श्वेता महाले पाटील आढावा बैठकीत भावनिक

पिकं करपली, शेतकरी हवालदिल; श्वेता महाले पाटील आढावा बैठकीत भावनिक

MLA Shweta Mahale Patil: शेतकरी वर्षभर कष्ट करून पिकाची काळजी घेतो; मात्र ऐन उत्पादनाच्या काळात पावसाने दगा दिल्याने त्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.पिकं करपली, शेतकरी हवालदिल

Sep 20, 2026
शिवरायांच्या रयतेच्या कल्याणाचा विचार घेऊन देवाभाऊंचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी: आ. श्वेता महाले पाटील

शिवरायांच्या रयतेच्या कल्याणाचा विचार घेऊन देवाभाऊंचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी: आ. श्वेता महाले पाटील

MLA Shweta Mahale Patil: “छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा विचार सदैव स्मरणात ठेवूनच देवाभाऊंचे सरकार शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. संकटाच्या काळात जनतेला आधार

Sep 18, 2026
चिखली तालुक्यातील पुनर्वसन प्रश्नांसाठी श्वेता महाले यांचा धडाका; प्रशासनाकडून महत्त्वाचे निर्देश

चिखली तालुक्यातील पुनर्वसन प्रश्नांसाठी श्वेता महाले यांचा धडाका; प्रशासनाकडून महत्त्वाचे निर्देश

MLA Shweta Mahale Patil: विधानसभा मतदारसंघातील पुनर्वसनग्रस्त गावकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळाली आहे. आमदार श्वेता महाले पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची दखल

Sep 10, 2026
चिखलीत महायुतीच्या भव्य दहीहंडीचा थरार; हजारो चिखलीकरांच्या उपस्थितीत उत्साहाला उधाण

चिखलीत महायुतीच्या भव्य दहीहंडीचा थरार; हजारो चिखलीकरांच्या उपस्थितीत उत्साहाला उधाण

Chikhli DahiHandi Festival: श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देणाऱ्या दहीहंडी उत्सवाचा थरार, गोविंदांच्या मानवी मनोऱ्यांची चित्तथरारक उंची, ढोल-ताशांचा कडकडाट, डीजेच्या तालावर हजारो चिखलीकर..

Sep 06, 2026
गणेशोत्सवात गुलालाऐवजी पुष्पवृष्टीचा आदर्श जिल्हाभर राबवा: आ. श्वेता महाले पाटील

गणेशोत्सवात गुलालाऐवजी पुष्पवृष्टीचा आदर्श जिल्हाभर राबवा: आ. श्वेता महाले पाटील

MLA Shweta Mahale Patil: आमदार श्वेता महाले पाटील यांनी जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शांतता, सामाजिक सलोखा आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित..

Sep 04, 2026