आ. विजय वडेट्टीवार

विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवारांच्या अल्टिमेटमपुढे प्रशासन नरमले.. 

MLA Vijay Wadettiwar: गोसेखुर्द च्या पाण्याचे साकार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुटका घेतली. शेतकऱ्यांचा आंदोलन थांबवून, दि. १७ जुलै कोळी १० वाजता पाणी सोडले जाते. विजय वडेट्टीवार यांनी अल्टिमेटम

विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवारांच्या अल्टिमेटमपुढे प्रशासन नरमले.. 

MLA Vijay Wadettiwar

 

उद्या सकाळी १० वाजता गोसेखुर्दचे पाणी सोडणार
शेतकऱ्यांच्या मागणीला यश; प्रशासनाची तातडीने दखल

चंद्रपूर (MLA Vijay Wadettiwar) : विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी गोसेखुर्द धरणातून दोन दिवसांत सिंचनासाठी पाणी न सोडल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशाराव शेतकऱ्यांच्या रोषाला प्रशासनालाच सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली असून उद्या दि.१७ जुलै सकाळी १० वाजता गोसेखुर्द चे पाणी सोडणार असल्याचे कळविले आहे.

ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड, सावली तसेच परिसरातील हजारो शेतकरी पाण्याअभावी संकटात सापडले आहेत. धानासह अन्य पिके करपत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आ. वडेट्टीवार (MLA Vijay Wadettiwar) यांनी प्रशासनाला थेट अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर केवळ एका दिवसात प्रशासनाने निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

यावेळी आ. विजय वडेट्टीवार (MLA Vijay Wadettiwar) यांनी सांगितले की, "हा विजय माझा नसून शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि त्यांच्या हक्काच्या लढ्याचा आहे. प्रशासनाने योग्य वेळी निर्णय घेतल्यामुळे हजारो हेक्टर शेतीला दिलासा मिळणार आहे. मात्र, भविष्यात अशा प्रश्नांवर शेतकऱ्यांना आंदोलनाची वेळ येणार नाही, याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी."सोबतच गोसेखुर्द कालव्याची प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करून शेती हंगामात शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी मुबलक पाणी पुरवठा व्हावा याची वेळोवेळी काळजी संबंधित विभागाने घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.

गोसेखुर्दचे पाणी नियोजित वेळेत सोडले जाणार असल्याने सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असून हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आ. विजय वडेट्टीवार (MLA Vijay Wadettiwar) यांच्या ठाम भूमिकेमुळे आणि आक्रमक पाठपुराव्यामुळे प्रशासनाला अखेर झुकावे लागल्याची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू आहे. मतदार संघाचे प्रश्न असो अथवा राज्यातील कुठलेही प्रश्न असो आपल्या आक्रमक शैलीत न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार हे नेहमीच हिरीरीने प्रयत्न करतात. प्रत्येक सामन्याला न्याय मिळवून देणे हे लोकप्रतिनिधींचे आद्य कर्तव्य असून लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असल्याने लोकप्रतिनिधींनी जनतेसाठी समर्पित भावनेने कार्य केले पाहिजे असे मत विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार (MLA Vijay Wadettiwar) यांनी यावेळी व्यक्त केले.

संबंधित सामग्री

कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफीची रक्कम मिळूनही IOB एकलारा शाखेतील २८८ शेतकऱ्यांची खाती बंद नाहीत. नवीन पीक कर्जासाठी चार तास ठिय्या आंदोलनानंतर तातडीच्या कार्यवाहीचे आदेश.

Sep 26, 2026
शेतकरी उन्हात वाट पाहतच राहिले; मुख्यमंत्री न भेटताच निघून गेले!

शेतकरी उन्हात वाट पाहतच राहिले; मुख्यमंत्री न भेटताच निघून गेले!

तावशीतील शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तासन्‌तास उन्हात थांबले; भेट न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत करपलेल्या पिकांची होळी केली.

Sep 24, 2026
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

चंद्रपूर-गडचिरोलीतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महेंद्र ब्राह्मणवाडे यांची पत्रकार परिषद; धान खरेदी, नुकसानभरपाई, महामार्ग व रोजगाराच्या मागण्या.

Sep 18, 2026
नागभीडमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा; ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराची मागणी

नागभीडमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा; ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराची मागणी

धान बोनस, ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर आणि २४ तास वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात नागभीडमध्ये हजारो शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा.

Sep 17, 2026
पालकमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पालकमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दौऱ्यापूर्वी नामदेव पतंगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आरोप; जिल्हाभर आंदोलनाचा इशारा.

Sep 16, 2026