IPL 2026

9 वर्षांचा दुष्काळ संपला; 3273 दिवसांनंतर घडला चमत्कार!

IPL 2026: मध्ये डीसीविरुद्ध गुजरातच्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने ५५ धावा करून त्याचे नऊ वर्षांचे दुष्काळ संपवले. गिल आणि बटलरनेही अर्धशतकी खेळी केली.

9 वर्षांचा दुष्काळ संपला; 3273 दिवसांनंतर घडला चमत्कार!

IPL 2026

सुंदर आणि गिलच्या अप्रतिम खेळीमुळे गुजरातचा विजय

नवी दिल्ली (IPL 2026) : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आयपीएल 2026 च्या 14 व्या सामन्यात चौकार आणि षटकारांची उधळण पाहायला मिळाली. गुजरात टायटन्स (GT) चा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar), आयपीएल पदार्पणानंतर जवळपास नऊ वर्षांनी आपल्या कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. सुंदरने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अवघ्या 32 चेंडूंमध्ये 55 धावांची धडाकेबाज खेळी करत गुजरातच्या 210 धावांच्या विशाल धावसंख्येत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

2017 मध्ये पदार्पण केल्यापासून नऊ वर्षांनंतर पहिले अर्धशतक

वॉशिंग्टन सुंदरने 22 एप्रिल 2017 रोजी रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून आपल्या (IPL 2026) आयपीएल प्रवासाला सुरुवात केली. तेव्हापासून त्याने आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबादसारख्या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु अर्धशतकाचा जादुई टप्पा त्याला नेहमीच हुलकावणी देत ​​होता. त्याची यापूर्वीची सर्वोच्च धावसंख्या 49 होती, जी त्याने 2025 मध्ये हैदराबादविरुद्ध केली होती.

कर्णधार गिलसोबत उत्कृष्ट भागीदारी

दिल्लीविरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, त्याने सहा चौकार आणि दोन षटकार मारून धावांचा दुष्काळ संपवला. (Washington Sundar) सुंदरच्या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे कर्णधार (Shubman Gill) शुभमन गिल (70) सोबतचा त्याचा ताळमेळ. या दोघांनी अवघ्या 60 चेंडूंमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. गिलने एक बाजू सांभाळली, तर सुंदरने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत दिल्लीच्या गोलंदाजांवर दबाव टाकला.

बटलर आणि सुंदरचा दुहेरी धमाका

गुजरातच्या डावात केवळ सुंदरच (Washington Sundar) चमकला नाही, तर जोस बटलरनेही इतिहास रचला. बटलरने 27 चेंडूंमध्ये 52 धावा केल्या आणि टी-20 क्रिकेटमधील आपला 600 वा षटकार पूर्ण केला. वेस्ट इंडिजबाहेर हा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला. या (IPL 2026) तीन अर्धशतकांच्या (गिल, सुंदर, बटलर) जोरावर गुजरातने 20 षटकांत 210/4 धावा केल्या.

संबंधित सामग्री

शुभमन गिलचा विक्रमी द्विशतक; वनडेमधील सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग

शुभमन गिलचा विक्रमी द्विशतक; वनडेमधील सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग

Shubman Gill Record: वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने विक्रमी द्विशतक झळकावत इतिहास रचला. गुवाहाटी येथे वेस्ट इंडिजने दिलेल्या 406 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग

Oct 01, 2026
अभिषेक शर्माने रचला भारतीय टी-20 क्रिकेटमध्ये मोठा विक्रम

अभिषेक शर्माने रचला भारतीय टी-20 क्रिकेटमध्ये मोठा विक्रम

Abhishek Sharma Record: भारताचा युवा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार फलंदाजी करत भारतीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासात मोठा विक्रम आपल्या नावे केला...

Sep 14, 2026
शुभमन गिलने रचला इतिहास; एक हजार धावांचा पराक्रम

शुभमन गिलने रचला इतिहास; एक हजार धावांचा पराक्रम

Shubman Gill: भारतीय कर्णधार शुभमन गिलने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात अर्धशतक झळकावत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या एका पर्वात कर्णधार म्हणून एक हजार धावा पूर्ण

Aug 24, 2026
वैभव सूर्यवंशी अभिनेता बनणार? प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिली चित्रपटाची ऑफर?

वैभव सूर्यवंशी अभिनेता बनणार? प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिली चित्रपटाची ऑफर?

Vaibhav Suryavanshi: आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सर्वाधिक चर्चेत राहिला. त्याने 16 सामन्यांमध्ये 776 धावांना जिंकले, इतिहास रचला आणि भारतीय क्रिकेट

Jun 02, 2026
RCB ला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनवणारे हे 6 सुपरहिरो?

RCB ला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनवणारे हे 6 सुपरहिरो?

IPL 2026 RCB Win Trophy: आरसीबीने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल ट्रॉफी जिंकली. विराट कोहली, रजत पाटीदार, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, कृणाल पांड्य, रसिक सलाम दार

Jun 01, 2026