पद्मश्री पुरस्कार 2026

क्रिकेटविश्वासाठी अभिमानाचा क्षण; हरमनप्रीत कौर पद्मश्रीने सन्मानित

Padma Awards 2026: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी नवी दिल्लीत आयोजित एका भव्य समारंभात देशातील नामांकित क्रीडा व्यक्तिमत्त्वांना प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार प्रदान केला.

क्रिकेटविश्वासाठी अभिमानाचा क्षण; हरमनप्रीत कौर पद्मश्रीने सन्मानित

Padma Awards 2026

नवी दिल्ली (Padma Awards 2026) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी सोमवारी नवी दिल्लीत आयोजित एका भव्य समारंभात देशातील नामांकित क्रीडा व्यक्तिमत्त्वांना प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. यावर्षी जानेवारीमध्ये जाहीर झालेल्या या पुरस्कारांच्या यादीत नऊ क्रीडा दिग्गजांचा समावेश होता, ज्यांना देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

राष्ट्रपती भवनात आयोजित या विशेष नागरी पुरस्कार सोहळ्यात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांना क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार (Padma Awards 2026) प्रदान केला. महिला क्रिकेटला नव्या उंचीवर नेणाऱ्या हरमनप्रीत आणि पॅरालिम्पिक खेळांमध्ये देशाला गौरव मिळवून देणारे सुवर्णपदक विजेते पॅरा-उंच उडीपटू प्रवीण कुमार यांनाही या सन्मानाने गौरविण्यात आले.

या वर्षीच्या पद्म पुरस्कारांसाठी (Padma Awards 2026) क्रीडा श्रेणीत निवडलेल्या नऊ प्रमुख व्यक्तींमध्ये, भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा स्फोटक खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) याचे नाव प्रामुख्याने आहे. हरमनप्रीत सिंग यांचा राष्ट्रपतींसोबतचा एक व्हिडिओ समोर आला, पण त्यात रोहित शर्मा दिसले नाही. ते रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळत होते.

इतर खेळांतील खेळाडूंच्या नावांचाही समावेश

यावर्षी क्रीडा जगतातून (Padma Awards 2026) पद्म पुरस्कारांसाठी निवडलेल्या खेळाडूंमध्ये पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता उंच उडीपटू प्रवीण कुमार, तसेच हॉकीपटू सविता पुनिया आणि बलदेव सिंग यांचा समावेश होता. मार्शल आर्ट्ससाठी भगवानदास रायकवार यांची निवड झाली. तथापि, आज त्या सर्वांना पुरस्कार प्रदान करण्यात आले नाहीत. ज्यांची नावे आजच्या सोहळ्यात समाविष्ट होती, त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते वैयक्तिकरित्या पुरस्कार प्रदान करण्यात आले.

संबंधित सामग्री

हरमनप्रीत कौरने सोडले टीम इंडियाचे कर्णधारपद

हरमनप्रीत कौरने सोडले टीम इंडियाचे कर्णधारपद

Harmanpreet Kaur's captaincy: भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नेतृत्वातील एका महत्त्वपूर्ण पर्वाचा अंत झाला आहे. अनुभवी क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरने भारतीय महिला संघाच कर्णधारपद सोडण्याचा निर्णय

Oct 06, 2026
शुभमन गिलचा विक्रमी द्विशतक; वनडेमधील सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग

शुभमन गिलचा विक्रमी द्विशतक; वनडेमधील सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग

Shubman Gill Record: वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने विक्रमी द्विशतक झळकावत इतिहास रचला. गुवाहाटी येथे वेस्ट इंडिजने दिलेल्या 406 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग

Oct 01, 2026
अभिषेक शर्माने रचला भारतीय टी-20 क्रिकेटमध्ये मोठा विक्रम

अभिषेक शर्माने रचला भारतीय टी-20 क्रिकेटमध्ये मोठा विक्रम

Abhishek Sharma Record: भारताचा युवा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार फलंदाजी करत भारतीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासात मोठा विक्रम आपल्या नावे केला...

Sep 14, 2026
निवृत्तीच्या निर्णयावरून रोहित शर्मा संतापला; निवडकर्त्यांच्या संदेशाने वाढला तणाव

निवृत्तीच्या निर्णयावरून रोहित शर्मा संतापला; निवडकर्त्यांच्या संदेशाने वाढला तणाव

रोहित शर्मा या कर्णधाराने वनडे कॅरियरमध्ये निवृत्तीची चर्चा सुरू केली आहे. त्या याच्यावर समितीतून बाहेर असलेल्या भविष्यातील योजनांच्या दाव्यातून तणाव पोचला आहे. निवड समितीतून त्या साठी निलंबन नाकारून इंगलंडविरुद्धचे वनडे नमून ना मात्कार ना रोहित या तिकट्या विकल्पावर चर्चा चालू आहे.

Sep 03, 2026
व्ही. व्ही. एस. लक्ष्मण बनणार क्रिकेट डायरेक्टर

व्ही. व्ही. एस. लक्ष्मण बनणार क्रिकेट डायरेक्टर

V. V. S. Laxman: भारतीय क्रिकेट नियामक मंडळात माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सध्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख असलेल्या लक्ष्मण यांचा कार्यकाळ

Aug 14, 2026